E-Crop Survey Agrowon
ॲग्रो विशेष

E-Crop Survey: खरिपात ई-पीक पाहणी करा

Kharif 2025: ठाणे तालुक्यात सध्या खरीप हंगामातील पीक पाहणीची कार्यवाही सुरू झाली आहे. खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईलचे ॲप व्हर्जन ४.०० अद्ययावत स्वरूपात गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे.

Team Agrowon

Thane News: ठाणे तालुक्यात सध्या खरीप हंगामातील पीक पाहणीची कार्यवाही सुरू झाली आहे. खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईलचे ॲप व्हर्जन ४.०० अद्ययावत स्वरूपात गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ॲप अपडेट करून घेण्याचे आवाहन महसूल विभागाकडून करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंद न केल्यास शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या समस्यांना तोंड देण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोंद न केल्यास सरकारच्या विविध योजना, अनुदान वाटप, आपत्ती संबंधी मिळणाऱ्या अर्थसहाय्याला शेतकऱ्यांना मुकावे लागण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे ई-पीक पाहणी करणे गरजेचे बनले आहे.

ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल ॲपच्या साह्याने सर्व शेतकऱ्यांनी मोबाइलद्वारे सातबारा उताऱ्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकांची नोंदणी १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. ॲपद्वारे शेतकऱ्यांनी पिकांची माहिती स्वतः भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मोबाइलवर २० खातेदारांची पीक पाहणी भरता येऊ शकते.

महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे. शहापूर शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन महसूल विभागाने केले आहे.ॲपद्वारे पीक पेरा भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. ॲपमध्ये नोंदविलेला पीक पेरा थेट सातबारावर येणार आहे.

त्यामुळे योजनांचा लाभ मिळण्यासाठी याची मदत होणार आहे. या ॲपद्वारे शेतातील पिकांची नोंद स्वतः शेतकऱ्याने शेतात जाऊन करावयाची आहे. तसे न केल्यास सातबारा कोरा राहू शकतो. परिणामी, सरकारकडून मिळणारी मदत, पीकविमा, पीक कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होणार आहेत. शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या पीक पाहणी संबंधी ‘माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा’ या संकल्पनेनुसार ई-पीक पाहणी ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे.

...तर लाभ मिळणार नाही

ई-पीक पाहणीची नोंद न केल्यास शेत पडीक किंवा पेरणी झालीच नाही, असे गृहीत धरण्यात येईल. पुढील हंगामासाठी कोणत्याही बँकेकडून पीककर्ज घेताना अडचणी निर्माण होतील, प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ मिळणार नाही.सरकारद्वारे पिकाला अर्थसाह्य जाहीर केले, तर त्यापासूनही वंचित राहावे लागेल, वन्य प्राण्यांनी नुकसान केल्यास त्याचीही भरपाई मिळू शकणार नसल्याने ई-पीक पाहणी करण्याचा आग्रह धरण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Millets Board : राष्ट्रीय भरडधान्य मंडळ स्थापन करण्याचा विचार नाही; केंद्र सरकारचे लोकसभेत उत्तर

Pimpalgaon APMC Controversy: अजितदादांचा आणखी एक शिलेदार अडचणीत; ६२ कोटींच्या बांधकाम निवदांवरून वाद

Organic Farming Success : प्रतिकूलतेतही नगदी पिकांचे दर्जेदार सेंद्रिय उत्पादन

Sugarcane Nutrient Management: आडसाली उसासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन

Ind-US Trade Conflict : शेतकरी हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार: पंतप्रधान मोदी यांचे डोनाल्ड ट्रम्पला उत्तर

SCROLL FOR NEXT