Kharif Crop Inspection Delay  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop Inspection Delay : खरीप पीक पाहणीला अद्याप मुहूर्त नाही

E-Pik Pahani Delay : राज्यात खरीप हंगाम अंतिम टप्प्यात येत असला, तरी अद्याप ई-पीक पाहणी प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झालेली नाही. या प्रशासकीय विलंबामुळे पीक विमा आणि कर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याने राज्यातील शेतकरी कमालीचे चिंतेत आहेत.

Team Agrowon

E-Pik Pahani delay : खरीप हंगामातील पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र पीकविम्यासाठी आवश्यक असलेली पीक पाहणीची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे पीकविमा योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

खरीप हंगामातील पेरणी पूर्ण झाली असून, अनेक भागांत पिकांची उगवण आणि वाढ सुरू झाली आहे. पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद आणि पीक पाहणी बंधनकारक करण्यात आली आहे. गतवर्षीपर्यंत पीक पाहणी ऑनलाइन ॲपद्वारे शेतकऱ्यांनाच करावी लागत होती. मात्र मोबाइल हाताळताना येणाऱ्या अडचणी आणि नेटवर्कच्या समस्येमुळे यंदापासून ही प्रक्रिया महसूल विभागाकडे सोपविण्यात आली आहे. १५ जुलैपासून पीक पाहणीला सुरुवात होणार होती. मात्र विमा भरण्याची अंतिम मुदत जवळ आली असतानाही पीक पाहणीची प्रक्रिया सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

गत दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. पुढील २४ तासांत जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अशा परिस्थितीत तग धरलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास पीक पाहणी न होता विमा कंपनी ते नुकसान ग्राह्य धरेल का, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

पीकविमा घेण्यासाठी पीक पाहणी आवश्यक आहे. मात्र अद्याप त्यास सुरुवात झालेली नाही. ज्या शेतकऱ्यांना पीकविमा घ्यायचा आहे, त्यांना हमीपत्र भरून पीकविम्यात सहभागी होता येते.
- आर. जे. मनोहरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर
दरवर्षीप्रमाणे यंदाही पीकविमाबाबत गोंधळाची स्थिती आहे. विमा कंपनीच्या करारात ई-पीक पाहणीची अट असली, तरी प्रशासनाकडून हमीपत्र भरून विमा सहभाग नोंदविता येतो, असे सांगितले जात आहे. मात्र, उद्या विमा कंपनीने हे नाकारल्यास त्याची जबाबदारी कोणाची राहणार?
- मनीष जाधव, प्रदेश प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Farm Loan Waiver: 'कर्जमुक्ती'साठी दुसऱ्या टप्प्यात ४ हजार कोटी निधी वितरित, शासन निर्णय जारी

Nanded Rainfall : नांदेडला पावसाने पुन्हा दिली ओढ

Fake Soybean Seeds: बोगस निविष्ठा उत्पादकांवर कारवाई करा

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरिपाचा ९९ टक्के पेरा

Rainfall Deficit: पंधरवड्यापासून पावसाची दडी; पिकांची वाढ खुंटली

SCROLL FOR NEXT