Banana Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Cultivation : खानदेशात केळी लागवड रखडत

Banana Farming : खानदेशात केळी लागवड सध्या रखडत सुरू आहे. चांगले कंद सध्या मिळत नाहीत. तसेच रोपांचा पुरवठाही विस्कळीत किंवा अनियमित स्वरूपात सुरू आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात केळी लागवड सध्या रखडत सुरू आहे. चांगले कंद सध्या मिळत नाहीत. तसेच रोपांचा पुरवठाही विस्कळीत किंवा अनियमित स्वरूपात सुरू आहे. यामुळे वेळेत किंवा नियोजनानुसार लागवड शक्य होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

खानदेशात यंदा गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात केळी दर टिकून होते. यामुळे पुढील वर्षी बाजारपेठ हेरण्यासाठी ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये काही भागांत केळी लागवड झाली. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये कांदेबाग केळीची लागवड खानदेशात केली जाते. जळगाव जिल्ह्यात चोपडा, पाचोरा-भडगाव, जामनेर, जळगाव, धुळ्यातील शिरपूर या भागांत कांदेबाग केळीची लागवड अधिक असते.

रावेर, यावल भागात अपवादानेच काही शेतकरी लागवड करतात. पण यंदा या भागातही सप्टेंबरमध्ये केळी लागवड वाढल्याचे दिसले आहे. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत केळी लागवडीसाठी कमाल शेतकरी केळीचे कंद उपयोगात आणतात. दर्जेदार केळीचे वाण किंवा कंद लागवडीवर शेतकऱ्यांचा भर असतो.

त्यासाठी आंबेमोहोर, श्रीमंती, महालक्ष्मी, सातमासी, वसई व ग्रॅण्ड नैन या वाणांच्या कंदांना शेतकरी पसंती देतात. कंद नोव्हेंबरमध्ये बऱ्यापैकी होते. केळी कंद औरंगाबादमधील कन्नड, सोयगाव, जळगावमधील जामनेर, रावेर, यावल, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, अक्कलकुवा या भागांत मुबलक प्रमाणात उपलब्ध होते.

हलक्या, मध्यम जमिनीत काळ्या कसदार क्षेत्रातील कंद लागवडीला शेतकरी पसंती देतात. तर काळ्या कसदार जमिनीत हलक्या, मध्यम जमिनीत कंद लागवडीला पसंती दिली जाते. परंतु गेले २० ते २५ दिवस खानदेशात कंदांचाही तुटवडा आहे. दर्जेदार कंद मिळत नाहीत. तसेच रोपांचाही पुरवठा हवा तसा नाही. यातच धार्मिक, घरगुती कार्यक्रम, सणवार यामुळे केळी लागवड रखडत सुरू आहे.

केळी रोपांचे दरही वाढले आहेत. काही कंपन्यांनी ऐनवेळी केळी रोपे पुरवठ्याबाबत नकार दिला. शेतकऱ्यांकडून घेतलेले आगाऊ पैसेही परत केले. यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर केळी लागवडीसंबंधी अडचणी आल्या. यात केळी लागवड रखडली आहे.

केळी लागवड वाढली

ऑक्टोबरमध्ये वाफसा नाहीसा झाला होता. यामुळे केळी बागांमधून कंद काढणे, त्यांची लागवड, वाहतूक यावर परिणाम झाला. आता कंद व रोपे नसल्याने केळी लागवडीची गती कमी झाली. यंदा कांदेबाग केळीची खानदेशात सुमारे ३२ ते ३५ हजार हेक्टरवर लागवड होईल, अशी अपेक्षा आहे.

पावसामुळे जलसाठे मुबलक आहेत. यामुळे केळी लागवड काहीशी वाढेल, असे संकेत होते. यानुसार केळी लागवड वाढली आहे. जळगाव जिल्ह्यातील गिरणा भागात केळी लागवडीत सुमारे दोन ते अडीच हजार हेक्टरने वाढ झाली आहे. जळगाव, जामनेर, यावल, चोपडा भागांतही केळी लागवडीत मोठी वाढ दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातील एकूण केळी लागवड ६८ ते ७० हजार हेक्टरवर दिसत असल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT