Banana Farming : नवीन लागवडीसह पिलबाग व्यवस्थापनावर भर

Banana Production : संदीप महाजन यांची दुसखेडा व पाचोरा शिवारात १५ एकर शेती आहे. त्यात ५ एकरांत कांदेबाग लागवड आहे.
Banana Farming
Banana FarmingAgrowon
Published on
Updated on

Banana Farming Management :

शेतकरी नियोजन

पीक : केळी

शेतकरी : संदीप रवींद्र महाजन

गाव : दुसखेडा, ता.पाचोरा, जि.जळगाव

एकूण क्षेत्र : १५ एकर

केळी लागवड : पाच एकर (सहा हजार झाडे)

संदीप महाजन यांची दुसखेडा व पाचोरा शिवारात १५ एकर शेती आहे. त्यात ५ एकरांत कांदेबाग लागवड आहे. सध्या कांदेबाग लागवडीतील घड काढणीची कामे पूर्ण झाली आहेत. या बागेतील काढणी पूर्ण झाल्यानंतर त्यात खोडवा किंवा पिलबाग व्यवस्थापन करण्याचे नियोजन आहे.

Banana Farming
Banana Farming : केळी लागवड वाढण्याचे संकेत

कांदेबाग लागवडीसाठी १०० टक्के उतिसंवर्धित रोपांचा वापर केला जातो. काही वेळेस कंदांची लागवड देखील केली जाते. विशेषतः ग्रॅण्ड नैन या वाणाची रोपांच्या लागवडीवर भर असतो. लागवड सरीमध्ये सहा बाय पाच फूट अंतरावर केली जाते. सिंचनासाठी सिंगल लॅटरलचा वापर केला जातो. दोन ड्रीपमध्ये सव्वाफूट अंतर असते. शेतीच्या नियोजनात ड्रीपतज्ज्ञ शरद महाजन, कृषितज्ज्ञ बी. डी. जडे यांचे मार्गदर्शन त्यांना मिळते.

मागील कामकाज

मागील महिनाभर कांदेबाग लागवडीतील घड काढणीची कामे सुरू होती. सध्या काढणी पूर्ण झाली आहे. या बागेत पिलबाग व्यवस्थापन करण्याचे नियोजन आहे.

पीक निसवणीच्या अवस्थेत आल्यानंतर ०ः५२ः३४ तसेच मॅग्नेशिअम सल्फेट या खताचा वापर करण्यात आला.

निसवण पूर्ण झाल्यानंतर घडांचा दर्जा राखण्यासाठी शिफारशीत घटकांची फवारणी घेण्यात आली.

केळीच्या फण्यांची संख्या आठ ते नऊ एवढी राखण्यात आली. यामुळे केळीचे वजन वाढण्यास मदत झाली.

बाग निसवल्यानंतर बागेतील अतिरिक्त पाने व फुटवे काढण्याचे काम दर १० दिवसांत सुरू करण्यात आले.

Banana Farming
Banana Crop Management : वाढत्या थंडीत केळी बागेचे व्यवस्थापन

केळी पक्व होण्यासाठी पोटॅशियम शोनाइट ड्रीपद्वारे दिले.

या बागेतून एकरी सरासरी १८ टन केळी उत्पादन मिळाले आहे. सर्व मालाची जागेवरच व्यापाऱ्यांना थेट विक्री केली.

नवीन लागवडीचे नियोजन

कपाशी पीक निघाल्यानंतर त्या जमिनीत केळी लागवडीचे नियोजन आहे. त्यानुसार पूर्वतयारी सध्या सुरू आहे.

लागवडीपूर्वी एकरी तीन ट्रॉली प्रमाणे शेणखत शेतात पसरून घेतले जाईल. शेणखत पसरल्यानंतर जमिनीची खोल नांगरट करून रोटाव्हेटर फिरवून जमीन भुसभुशीत करून घेतली जाईल.

पूर्वतयारी झाल्यानंतर सऱ्या व ड्रीपची व्यवस्था केली जाईल.

साधारण ३ डिसेंबरच्या दरम्यान केळी कंदाच्या लागवडीचे नियोजित आहे. त्यानुसार कंदाची उपलब्धता करून घेतली जाईल.

लागवडीपूर्वी रासायनिक खतांचे बेसल डोस दिले जातील. त्यात सिंगल सुपर फॉस्फेट आणि गंधक यांचा वापर केला जाईल. त्यानंतर सऱ्या चांगल्या भिजवून नंतर लागवड केली जाईल.

लागवड ५ बाय ६ फूट अंतरावर केली जाईल.

खत व्यवस्थापन

लागवडीनंतर चौथ्या दिवशी मायकोरायझा ही बुरशी ड्रीपमधून दिली जाईल. यामुळे मुळांची वाढ होण्यास मदत होते. थंडी वाढल्यानंतर बुरशीनाशक, कीटकनाशकाची फवारणी घेतली जाईल.

पीक एक महिन्याचे झाल्यानंतर विद्राव्य खते देण्यास सुरवात केली जाईल. दर आठवड्याला एकरी पाच किलो प्रमाणे १९ः१९ः१९ देण्याचे नियोजन आहे.

आगामी नियोजन

कापूस पीक निघाल्यानंतर त्या क्षेत्रात ३ डिसेंबरला नवीन केळी लागवडीचे नियोजन आहे.

उतिसंवंर्धित रोपांच्या बागेत पिलबाग जोमात येतो. यामुळे आता पिलबाग व्यवस्थापनावर भर दिला जाईल. या बागेतून अतिरिक्त उत्पादन मिळते. कारण नव्याने रोपे लागवड, ड्रीप, मशागतीची कामे, व्यवस्थापन याची कार्यवाही करावी लागत नाही.

या बागेत रासायनिक खतांचे बेसल डोस दिले जातील. त्यात संयुक्त खतांची मात्रा दिली जाईल.

बागेत वाफसा स्थिती कायम ठेवण्यावर भर असेल.

अनावश्यक फुटवे, पाने काढली जातील. जो फुटला जोमात वाढेल, त्यावरच लक्षकेंद्रित केले जाईल.

विद्राव्य खतांचा अधिक वापर केला जाईल.

आगामी काळात थंडी तसेच ढगाळ हवामान अशी स्थिती कायम राहते. या दरम्यान प्रतिबंधात्मक रासायनिक फवारण्या घेतल्या जातील.

- संदीप महाजन ७९७२८४७९०४

(शब्दांकन : चंद्रकांत जाधव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com