Fruit Crop Pruning Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Pruning : फळे, फुलझाडांची छाटणी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

झाडाचे मुख्य खोड आणि त्यावरील फांद्या यांचे ठेवण मजबूत राहण्यासाठी झाडावर योग्य तितक्याच जोमदार फांद्या ठेवून बाकीच्या रोगट, अशक्त, एकमेकींत गुंतलेल्या निरुपयोगी फांद्या कापून टाकण्याच्या क्रियेला छाटणी म्हणतात.

Team Agrowon

फुलझाडे आणि फळझाडांना योग्य वळण आणि आकार देण्याकरिता छाटणी केली जाते. झाडाचे मुख्य खोड आणि त्यावरील फांद्या यांचे ठेवण मजबूत राहण्यासाठी झाडावर योग्य तितक्याच जोमदार फांद्या ठेवून बाकीच्या रोगट, अशक्त, एकमेकींत गुंतलेल्या निरुपयोगी फांद्या कापून टाकण्याच्या क्रियेला छाटणी म्हणतात.

छाटणीमुळे (Prunning) झाडाचा विस्तार योग्य प्रमाणात होऊन हवा आणि सूर्यप्रकाश यांचा फायदा झाडाच्या विस्ताराला मिळतो. त्यामुळे न छाटता राखलेल्या फांद्या जोमदारपणे वाढतात आणि त्यांना लागलेले फळे पक्व होईपर्यंत चांगली पोसली जातात.

काही फुलझाडांच्या व फळझाडांच्या बाबतीत चांगली दर्जेदार व मुबलक फळे व फुले मिळावी म्हणून योग्यवेळी नियमितपणे छाटणी करावी लागते.

काही वेळा झाडावर खूप भार येऊन गरजेपेक्षा जास्त फळधारणा होते. त्यामुळे झाडाच्या अंतर्गत अन्न व्यवस्थेवर ताण पडून त्यांची शक्ती क्षीण होऊन नुकसान होण्याची शक्यता असते. अशा प्रसंगी फळधारणा मर्यादित करण्याकरिता छाटणी करणे आवश्यक ठरते. 

छाटणीचे प्रकार

झाडांच्या फांद्यांचा वरचा भाग छाटणे आणि फांद्यांची त्यांच्या बुंध्यापासून छाटणी करणे असे छाटणीचे दोन प्रकार आहेत.  

पहिल्या प्रकारच्या छाटणीमुळे फांदीच्या झाडावर उरलेल्या भागावरील सूप्त अवस्थेतील डोळ्यांमधून जोरदार नवीन फूट निघते व त्याच्यावर फुले, फळे येतात.

सर्वच झाडांना नियमित छाटणी देणे आवश्यक असते असं नाही, फळझांडाना द्यावयाची छाटणी ही त्यांची वाढ, कोणत्या वाढीवर फळधारणा होते इत्यादी गोष्टीवर अवलंबून असते. त्याचा अभ्यास करून नियमित आणि योग्य प्रमाणात फळे यावीत म्हणून छाटणीची वेळ आणि प्रकार ठरवतात. 

सदापर्णी झाडांची छाटणी

आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी यासारख्या झाडांवर पाने नेहमी असणे आवश्यक असते. त्यामुळे या झाडांच्या वाळलेल्या रोगट व एकमेकीत गुंतलेल्या फांद्या छाटाव्यात.

यापेक्षा जास्त छाटणीची आवश्यकता नसते. प्रमाणाबाहेर छाटणी केल्यास फळे येणाऱ्या शाखाच कापल्या जाऊन विपरीत परिणाम होतो.

जसे संत्र्याच्या झाडाला जुन्या वाढीवर नवीन फूट आणि फुले येतात. प्रमाणाबाहेर छाटणी होऊनही जुनी वाढ तोडली गेल्यास अनिष्ट परिणाम होतो .फुलांचा बहार चांगला येत नाही. 

पानगळ होणाऱ्या झाडांची छाटणी 

सदापर्णी झाडांपेक्षा पानगळ होणाऱ्या झाडांची छाटणी जास्त व नियमित करावी लागते. अंजीर, बोर, द्राक्ष या फळझाडांची नियमितपणे छाटणी करावी लागते.

शोभेची झाडे, झुडपे व कुंपणे यांच्या झाडांचा जोम कायम राहण्याकरिता व त्यांचा आकार व्यवस्थित ठेवण्यासाठी वेळोवेळी छाटणी करणे जरुरीचे असते.

गुलाबाच्या झुडपाला त्याच्या जातीप्रमाणे व प्रकारानुसार चांगली फुले येण्यासाठी दर वर्षी कमी जास्त प्रमाणात छाटणी द्यावी लागते.

छाटणीचा हंगाम वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांकरिता वेगवेगळा असतो. मात्र सामान्यपणे फळझाडांना त्यांच्या सुप्तावस्थेत व नवीन फूट येण्यापूर्वी छाटणी देतात.

पानगळ होणाऱ्या झाडांच्या बाबतीत त्यांच्या पानगळीचा काळ हा सुप्तावस्थेचा काळ समजतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT