River Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

River Conservation : कासाडी नदीच्या संवर्धनासाठी १७ कोटींचा निधी

Kasadi River : एकेकाळी या परिसरातील गावांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या कासाडी नदीतील पाण्यावर रासायनिक सांडपाण्यामुळे फेस पसरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Team Agrowon

Panvel News : राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांच्या आदेशानुसार तळोजा औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्याकडून दंडापोटी व्याजासह वसूल करण्यात आलेली १७ कोटी ४४ लाख २२ हजार रुपये रक्कम रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा होती.

या रकमेतील आयआयटी पवईची रक्कम वगळून उर्वरित शिल्लक रक्कम पनवेल महापालिकेच्या बँक खात्यात वर्ग करण्याला मंजुरी सर्वानुमते देण्यात आली आहे. त्यामुळे तळोजामधून वाहणाऱ्या कासाडी नदीच्या संवर्धनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या पैशातून नदीचे संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

तळोजा औद्योगिक वसाहतीतून वाहणाऱ्या कासाडी नदीला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. एकेकाळी या परिसरातील गावांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या कासाडी नदीतील पाण्यावर रासायनिक सांडपाण्यामुळे फेस पसरत असल्याचे पाहायला मिळत आहे. नदीची प्रदूषणापासून मुक्तता करण्यासाठी प्रशासन करीत असलेले प्रयत्न निष्फळ ठरले असल्याचे चित्र दिसत आहे.

‘सकाळ’च्या वृत्तामुळे कासाडी नदीतील प्रदूषणाची दखल जागतिक माध्यमांनीदेखील घेतली आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीच्या पूर्वेकडून पश्चिमेस कासाडी नदी वाहते. हाजीमलंग डोंगराच्या पायथ्यापासून स्वच्छ व पारदर्शक असा निर्मळ पाण्याचा प्रवाह या नदीतून वाहतो; परंतु नदीचा प्रवाह तळोजा औद्योगिक वसाहतीच्या जवळ येताच पाण्याचा रंग बदलतो. कासाडी नदीच्या प्रदूषणामुळे नाल्यात रूपांतर होत आहे.

तळोजा एमआयडीसी क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातील प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीच्या पाण्याचा रंग बदलला आहे. नदीच्या पात्रात सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे मासे व इतर जलचरांना धोका निर्माण झाला आहे. मासे मृत पावण्याचे प्रकार नेहमीचेच झाले आहे.

मुंबई आयआयटीचा २३५ पानांचा अहवाल

आयआयटी मुंबईच्या पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाच्या तीन प्राध्यापकांनी कासाडी नदी पुनर्जीवित करण्याचा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला २३५ पानांचा अहवाल सादर केला आहे. तळोजा एमआयडीसीतून वाहणाऱ्या कासाडी नदीचे पाणी प्रदूषित असल्याचा निष्कर्ष मुंबई आयआयटीने काढला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानंतर नदीच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Namo Installment : नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वितरण

Education Innovation: लिहायला लावणारा शिक्षक

Dairy Farming Success : संघर्षाला मिळाला पूर्णविराम

Crop Compensation : देशभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे नुकसान; खरीपातील उत्पादन घटणार?

Sericulture Farming: काटेकोर व्यवस्थापनातून रोखला उझी माशीचा प्रादुर्भाव

SCROLL FOR NEXT