Crab Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Crab Farming : बंदीस्त खेकडा पालन करण्यासाठी प्रोत्साहन

Crab Production : काळ्या पाठीचा खेकड्याच्या बंदिस्त पालनासाठी घरच्या पाठीमागील जागेत पेपर बॅग वापरून खेकड्यांना त्यात त्याचा नैसर्गिक अधिवास तयार करून चांगल्या प्रकारे खेकडा उत्पादन घेतले जाते.

Team Agrowon

Kolhapur News : कृषी व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)च्या वतीने करवीर तालुक्यात बंदीस्त खेकडा पालन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. भाटणवाडी (ता. करवीर) येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बंदिस्त खेकडा पालन करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. या अंतर्गत आत्म्याच्या माध्यमातून प्रथमतः २० शेतकऱ्यांना खेकडा पालनासाठी खेकड्याचे पिलं देण्यात येणार आहेत.

काळ्या पाठीचा खेकड्याच्या बंदिस्त पालनासाठी घरच्या पाठीमागील जागेत पेपर बॅग वापरून खेकड्यांना त्यात त्याचा नैसर्गिक अधिवास तयार करून चांगल्या प्रकारे खेकडा उत्पादन घेतले जाते. सामूहिक पद्धतीने खेकडा पालन केले, तर सर्व शेतकऱ्यांच्या कडून एकत्रितरीत्या खेकडा गोळा करून पुणे, मुंबई गोवा येथे विक्री करून आर्थिक नफा मिळवून देण्यास मदत होणार आहे.

खेकडा पालन गटाचे अध्यक्ष कृष्णात पाटील यांच्या पुढाकाराने खेकडा पालन शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी भाटणवाडी, कांचनवाडी, सोनाळी, हसूर येथील १५ शेतकऱ्यांनी हा शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी तयारी केली आहे.

खेकडा पालन केलेल्या शेतकऱ्यांना ‘आत्मा’च्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी नुकतीच भेट दिली. सहाय्यक कृषी अधिकारी पल्लवी रणवरे, ‘आत्मा’चे निखिल कुलकर्णी, कृष्णात पाटील, संजय भोसले, श्रीकांत पाटील, सरिता पाटील, विलास हातकर आदि यावेळी उपस्थित होते.

खेकडा पालन हा व्यवसाय दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी केला तर त्यांना यातून निश्चित फायदा होणार आहे.
- रक्षा शिंदे,प्रकल्प संचालक, आत्मा, कोल्हापूर.
करवीर तालुक्यात खेकडा पालनाला मोठा वाव आहे. शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीचा स्रोत म्हणून याकडे पहावे
- वनिता पवार, संजय गांधी निराधार योजना
खेकडा पालनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पुढे यावे. यासाठी येथून पुढे सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.
- सुंदरम माने, कृषी व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा, कोल्हापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Reform: स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे हमीभाव द्या: संजय खोडके

Farm Land Dispute: कोलकात्याच्या कंपनीचा शेतजमिनीवर दावा

E Crop Survey: रब्बीतील ‘ई-पीक पाहणी’ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

Stamp Duty Refund: मुद्रांक शुल्क परतावा प्रक्रिया गतिमान

Agriculture Chief Statistician: राज्याला मिळाला अखेर पूर्णवेळ मुख्य सांखिक

SCROLL FOR NEXT