Drought agrowon
ॲग्रो विशेष

Crop insurance : 'या' राज्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १००० कोटींची तरतूद

Crop insurance for drought affected farmers : महाराष्ट्राप्रमाणेच देशाच्या इतर राज्यातही दुष्काळ पडत आहेत. त्यानुसार प्रत्येक राज्याने त्यांच्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. दरम्यान आपल्या महाराष्ट्राच्या शेजारील राज्याने देखील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी तिजोरी खोलली असून जवळपास ५०० कोटींचा निधी उपलब्घ करून दिला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातही दुष्काळाचे चटके शेतकऱ्यांना बसत आहेत. त्यामुळे याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला आहे. तर यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्नाटक सरकारने पावले उचलली आहेत. तसेच राज्यातील सुमारे सात लाख शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम म्हणून ४७५ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आल्याची माहिती कर्नाटकचे कृषी मंत्री एन. चेलुवरायस्वामी यांनी दिली आहे. त्यांनी ही माहिती शुक्रवारी (ता १२ रोजी) कृषी मेळा आणि फार्म एक्स्पोचे उद्घाटन केल्यानंतर दिली. हा कृषी मेळा आणि फार्म एक्स्पो मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथे भरवण्यात आला आहे.

राज्यातील केवळ दोन टक्के शेतकऱ्यांनीच त्यांच्या पिकांचा विमा उतरवला असून ही संख्या सुमारे २० लाख आहे. पण सध्या दुष्काळ असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता ही रक्कम ही वाढवण्यात येणार आहे. जी एक हजार कोटी रुपयांत करण्यात येईल अशी घोषणा कृषी मंत्री चेलुवरायस्वामी यांनी केली.

पुढे चेलुवरायस्वामी म्हणाले, शेती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा लाभ, कृषी उपकरणांची उपलब्धतेसाठी कृषी विद्यापीठे आणि विभागांना आपापली भूमिका पार पाडावी. तसेच, शेतकऱ्यांना नवीन कृषी तंत्रज्ञानाचा लाभ घेता यावा यासाठी त्यांना पूर्णपणे प्रोत्साहन दिले पाहिजे. देशातील सुमारे ७० टक्के लोकसंख्या शेती व्यवसायात गुंतलेली आहे. असे असूनही बहुतांश शेतकरी आर्थिकदृष्ट्या मागासलेले असून त्यांच्या कल्याणासाठी तरतूद करणे हे शासन व समाजाचे कर्तव्य असल्याचे चेलुवरायस्वामी म्हणाले.

कृषी क्षेत्राचा विकास

चेलुवरायस्वामी म्हणाले की, नुकताच बेंगळुरू येथे आयोजित आंतरराष्ट्रीय बाजरी मेळा अतिशय यशस्वी झाला आणि शेतकऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. ते म्हणाले की, आयटी आणि बीटी क्षेत्राप्रमाणेच कृषी क्षेत्रातही तांत्रिक नवकल्पना झपाट्याने होत असून शेतकऱ्यांनी त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी कृषी नवकल्पनांचा अवलंब करणे आवश्यक आहे. हरित क्रांतीने देशाची व्यक्तिरेखा बदलली असली तरी कृषी क्षेत्रात अधिक विकासाची गरज असल्याचेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT