Ginger Crop agrowon
ॲग्रो विशेष

Ginger Crop : आले पिकावर ‘कंदकुज’चा प्रादुर्भाव, हजारो हेक्टर पिकाला फटका

sandeep Shirguppe

Sangli Ginger Crop : सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात आल्याचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. परंतु मागच्या दोन महिन्यात झालेला संततधार पाऊस, ऊन व वातावरणातील बदल आले पिकासाठी हानिकारक ठरू लागले आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात आले पिकास कंदकुज रोगावर प्रादुर्भाव वाढला आहे. याबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना समाधानकारक माहिती मिळत नसल्याने कंदकुज रोखण्यासाठी शेतकरीवर्ग महागड्या औषधांची फवारणी करीत आहेत.

जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत सांगली जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. तर या महिन्यात अचानक कडाक्याचे ऊन तर कधी पाऊस होत असल्याने आले पिकावर कंदकुजीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे. कडेगाव तालुक्यात एकंदरीत २ हजार ६00 हेक्टर आले पिकाची लागवड झाली आहे.

मात्र कंदकुजीमुळे जवळपास २५ टक्के आले पिकाचे क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज आहे. या हंगामासाठी बियाणाचा दर क्विंटलला १० हजारांच्या पुढे गेला होता. बियाणाचे दर आकाशाला भिडले असतानाही आले बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धाडसाने आले लागवड केली आहे. मे अखेरीस आले लागवड झाली होती.

कडेगाव तालुक्यात आले पिकांची सरासरी लागवड जेमतेम ८०० ते ९०० हेक्टर होत असते. मागील दोन वर्षांत समाधानकारक दर मिळाला आहे. त्यामुळे या हंगामात आले पीक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने बियाणाचा दर चढा असतानाही १७०० हेक्टर क्षेत्रात वाढ झाल्याचा अंदाज आहे. सुरवातीला आले पिकास पोषक वातावण होते. मात्र आता बिघडलेल्या वातावरणामुळे आले पिकास मोठ्या प्रमाणात कंदकुज झाली आहे.

हिरवेगार आल्याचे प्लॉट आता पिवळे पडू लागले आहेत. कंदकुज रोगापासून आपले पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. मात्र सतत वातावरणामुळे प्रादुर्भावात वाढ होताना दिसत आहे. जैविक, रासायनिक उपाय केले जात असल्याने खर्चात भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे आले उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये चढ उतार सुरु; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत सध्याचे हरभरा दर ?

Sugarcane FRP : ऊस उत्पादकांना ‘एफआरपी’बाबत अपेक्षा

Heavy Rain Damage : पुसदमध्ये अतिवृष्टिग्रस्तांना विशेष पॅकेज देण्याची मागणी

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन अनुदानासाठी प्रतीक्षाच

Crop Insurance : पालम तालुक्यातील शेतकरी पीकविमा परताव्यापासून वंचित

SCROLL FOR NEXT