Cleanliness State Level Awards Agrowon
ॲग्रो विशेष

Clean Village Competition : काळवाडीस स्वच्छतेचा राज्यस्तरीय पुरस्कार

Team Agrowon

Pune News : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा २०२०-२१ व २०२१-२२ घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये सोमवारी (ता. २३) छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिर येथे काळवाडी (ता. जुन्रर) ग्रामपंचायतीस राज्यस्तरीय ‘तृतीय’ क्रमांकाचा पुरस्कार पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील, अल्पसंख्याक व पणनमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य भागवत कराड, प्रधान सचिव संजय खंदारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ग्रामीण जनतेच्या आरोग्यमानाचा दर्जा उंचावणे व ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेच्या सवयींमध्ये सातत्य राखून ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान सुधारणे या उद्देशाने राज्य शासनाकडून २०००-०१ पासून राज्यात संत गाडगेबाबा अभियानांतर्गत दरवर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा हे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये काळवाडी गावास उत्कृष्ट कामगिरीसाठी तिसरा क्रमांक देण्यात आला आहे. स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्रक व दहा लाख रुपयांचे बक्षीस असे पुरस्काराचे स्वरूप होते.

सरपंच तुषार वामन, उपसरपंच बाबासाहेब वामन, माजी सरपंच अंजली वामन, ग्रामसेवक रवींद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास वामन, सदस्य रघुनाथ बेल्हेकर, पुष्पा मोहिते, छाया काकडे, कविता काकडे, मंगल वाकचौरे, दीपक काकडे, सोमनाथ वामन, कर्मचारी शांताराम वामन, स्नेहल औटी, संतोष वामन आदी ग्रामस्थांनी पुरस्कार स्वीकारला.

गावाने राबविलेले उपक्रम :

मृत व्यक्ती स्मरणार्थ वृक्ष लागवड व खतखड्याच्या राखेच्या माध्यमातून शेतीकरिता वापर, पर्यावरणपूरक नावीन्यपूर्ण उपक्रम

आरोग्यासाठी परसबागा

शाश्वत शेती विकासासाठी दहा ड्रम उभारणी, तसेच गाईच्या शेणापासून शेतीसाठी उपयुक्त स्लरी व उर्जानिर्मिती

कृषी पर्यटनाद्वारे महिलांना रोजगारनिर्मिती, महिला बचत गटांना प्रोत्साहन.

गाईच्या शेणापासून मंगल धूप, गोवरी, केळी प्रक्रिया व आवळा कॅन्डी व्यवसायास चालना देऊन शेतीमालाला मूल्यवर्धन याची जोड

त्रिस्तरीय गाळण पद्धतीद्वारे सांडपाणी व्यवस्थापन ई-एमचा वापर, गांडूळखतनिर्मिती प्रकल्प.

हा पुरस्कार म्हणजे गावाच्या २० वर्षांच्या एकत्रित स्वच्छतेच्या प्रयत्नांचा गौरव आहे. यामुळे आम्हा सर्वांची सामुदायिक जबाबदारी वाढली आहे. तसेच हा पुरस्कार आम्ही या अभियानाचे प्रणेते स्व. आर. आर. पाटील व गावातील थोर ग्रामनेता स्व. शरदराव वामन यांना श्रद्धांजलीपर अर्पण करत आहोत. यापुढेही आम्ही स्वच्छतेमध्ये सातत्य ठेवणार, इतर गावांना मार्गदर्शन करणार आहोत.
अजय बेल्हेकर, सामाजिक कार्यकर्ते

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक

Fig Management : अंजिरातील मीठा बहर व्यवस्थापन

Warana Milk : म्हैस खरेदीसाठी ४२ हजारांचे अनुदान, वारणा दूध संघाचा निर्णय

Agriculture Warehouse : गोदामाची रचना आणि सुरक्षिततेचे उपाय

Agri Tourism : मावळ तालुका झालाय ‘कृषी पर्यटन हब’

SCROLL FOR NEXT