Sugar Production  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Production : कादवा साखर कारखान्यात ३.९३ लाख क्विंटल साखरनिर्मिती

Sugarcane Crushing Season : यंदा उसाची उपलब्धता कमी असल्याने त्यातच ऊसतोड मजूर टंचाईने राज्यातील सर्वच कारखान्यांना अडचणींचा सामना करावा लागला आहे.

Team Agrowon

Nashik News : दिंडोरी तालुक्यातील राजारामनगर (मातेरेवाडी) येथील कादवा सहकारी साखर कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीतही साखर गळीत हंगामाची यशस्वी सांगता केली आहे. यंदाच्या हंगामात ३ लाख ५२ हजार ५५७ टन उसाचे गाळप करून सरासरी १२.१४ टक्के उतारा मिळवत तीन लाख ९३ हजार ५०० क्विंटल साखरनिर्मिती केली.

यंदा उसाची उपलब्धता कमी असल्याने त्यातच ऊसतोड मजूर टंचाईने राज्यातील सर्वच कारखान्यांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. कादवाने १३० दिवसांत गळीत हंगाम पूर्ण केला असून, गळीत हंगामाची सांगता अध्यक्ष श्रीराम शेटे यांचे हस्ते गव्हाणीत नारळ टाकून झाली.

शेटे यांनी हंगाम यशस्वी यशस्वी केल्याबद्दल ऊस उत्पादक, कामगार, ऊस तोड कामगार, ऊस वाहतूकदार, मालपुरवठादार यांचे आभार मानले. पुढील वर्षी जास्तीत जास्त गाळप करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले. इतर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवल्याने मोठया प्रमाणात ऊस पळवापळवी होत त्याचा फटका छोट्या कारखान्यांना बसत आहे. त्यामुळे कमी दिवसात जास्त गाळप करण्यासाठी कादवाची गाळप क्षमता वाढवावी लागेल असे सांगितले.

युनियनचे अध्यक्ष भगवान जाधव यांची भाषणे झाली. या वेळी सर्व मुकादमांचा सत्कार करण्यात आला. प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष शिवाजीराव बस्ते, सर्व संचालक मंडळ, सर्व विभागाचे खातेप्रमुख, कामगार उपस्थित होते. कारखान्यातर्फे सभासदांना सवलतीच्या दरात दिली जाणारी सा

खरेची अंतिम मुदत बुधवार (ता.३०) पर्यंत असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.

इथेनॉल प्रकल्प सुरू असणार

कादवाचे इथेनॉल प्रकल्पातून १३ एप्रिलअखेर ३९ लाख ४१ हजार ५५ लिटर इथेनॉल निर्मिती झाली असून एप्रिलअखेर इथेनॉल प्रकल्प सुरू असणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Harvesting: भात कापणी करताना शेतकरी मेटाकुटीला

Traders Issue: खानदेशात तेंदू पत्ता व्यावसायिकांना मदतीची अपेक्षा

Farmer Cup Training: अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फार्मर कपचे प्रशिक्षण

Rabi Sowing: तीन जिल्ह्यांत ७३ हजार हेक्टरवर पेरणी

Ativrushti Madat: अतिवृष्टी, महापूर नुकसानीचे ४०९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

SCROLL FOR NEXT