Kabuli Chana  Agrowon
ॲग्रो विशेष

Kabuli Chane Threshing : काबुली हरभऱ्याची मळणी पूर्ण

Chana Cultivation : खानदेशात काबुली हरभरा पिकाची मळणी पूर्ण झाली आहे. अनेक शेतकरी हरभरा साठवणूक करीत आहेत. क्षेत्र रिकामे झाल्याने त्यात पूर्वमशागत केली जात आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात काबुली हरभरा पिकाची मळणी पूर्ण झाली आहे. अनेक शेतकरी हरभरा साठवणूक करीत आहेत. क्षेत्र रिकामे झाल्याने त्यात पूर्वमशागत केली जात आहे. काबुली हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्रात सतत वाढ होत आहे. पेरणी अजूनही सुरूच आहे.

यंदाची पेरणी सर्वत्र झाल्याची स्थिती असून, सुमारे २८ ते ३० हजार हेक्टरवर ही पेरणी झाली होती. खानदेश काबुली हरभऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. या हरभऱ्याची पेरणी जळगावातील चोपडा, रावेर, यावल, धुळ्यातील शिरपूर या भागात केली जाते. याच भागात त्याचे मोठे क्षेत्र होते. यंदा काबुलीची पेरणी सर्वत्र झाली.

या हरभऱ्याची पेरणी ही काढणी पूर्ण झालेल्या केळी बागा, कापसाखालील रिकाम्या क्षेत्रात झाली होती. काबुलीचे बियाणेही महाग होते. १० किलो बियाण्यांची पिशवी १८०० ते २२०० रुपये दरात मिळाली. पेरणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अनेक जणांनी केली होती. काहींनी नोव्हेंबर व मार्चमध्ये पेरणी केली.

नंदुरबारमधील शहादा, तळोदा, नंदुरबार, धुळ्यातील धुळे, साक्री, जळगावातील मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर या भागातही पेरणी झाली. पाऊसमान चांगले राहिल्याने काबुलीची पेरणी वाढली.

चांगले दर देणारे पीक म्हणून काबुलीची ओळख आहे. हरभरा पेरणी दिवाळीनंतर सुरू होते. ती जानेवारीपर्यंत सुरू झाली. तर मळणी मार्चअखेर पूर्ण झाली. अनेक शेतकरी क्षेत्र रिकामे करून खोल नांगरणी करून ते तापू देत आहेत. पुढे मेमध्ये त्यात केळी लागवडीचे नियोजन आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loss Compensation: मागणी ५७० कोटींची, मिळाले ३८ कोटी

Natural Farming: जमीन सुपीकतेसाठी नैसर्गिक शेती महत्त्वाची

Farmer Support: अतिवृष्टीबाधित शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात

Inspiring Farmer Story: दौंड्या काठची आरती अन् दीपक

Crop Loss Relief: अतिवृष्टी अनुदानाचे २५३ कोटी रुपये पोर्टलवर अपलोड

SCROLL FOR NEXT