Highway Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Protest: पुणे-नाशिक द्रुतगती महामार्गास जुन्नरमधील शेतकऱ्यांचा विरोध

Highway Issue: पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा, रद्द झाल्याची राज्य सरकारने अधिसूचना काढावी, या आग्रही मागणीसाठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने बैठक घेतली.

Team Agrowon

Alephata News: पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा, रद्द झाल्याची राज्य सरकारने अधिसूचना काढावी, या आग्रही मागणीसाठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने बैठक घेतली.

या वेळी शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख बाळासाहेब औटी म्हणाले, ‘‘संघर्ष समितीने अनेक आंदोलने केली. परंतु सरकारला आमचा विरोध दिसत नसल्याने तीव्र आंदोलन उभे करावे लागणार आहे.

यासाठी सर्व बाधित शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपली एकजूट दाखवून देण्याची गरज आहे. सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधी, मंत्र्यांच्या दारात सविनय पद्धतीने हट्टाग्रह आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.’’

औद्योगिक महामार्ग संघर्ष समितीच्या या बैठकीला राजुरी गावचे उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके, शेतकरी संघर्ष समितीचे सहप्रमुख वल्लभ शेळके, समितीचे समन्वयक एम. डी. घंगाळे, मोहन नाईकवाडी, गोविंद हाडवळे, प्रतीक जावळे, दिलीप जाधव, अविनाश हाडवळे, खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यांतील शेतकरी समितीचे सदस्य उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT