Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Millet Sowing : तृणधान्यांची चार हजार हेक्टरवर पेरणी

Kharif Season : यंदाच्या (२०२५) खरीप हंगामातही परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ज्वारी, बाजरी, मका या तृणधान्यांच्या पेरणीत घट झाली आहे.

Team Agrowon

Parbhani News : यंदाच्या (२०२५) खरीप हंगामातही परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ज्वारी, बाजरी, मका या तृणधान्यांच्या पेरणीत घट झाली आहे. पेरणीत दरवर्षी घट होत असल्याने या दोन जिल्ह्यांतील तृणधान्यांचे सरासरी क्षेत्र कमी झाले आहे. शुक्रवार (ता.२५) पर्यंत परभणी जिल्ह्यात १ हजार ३९५ हेक्टर (२५.६१ टक्के), तर हिंगोली जिल्ह्यात २ हजार ८८५ हेक्टर (९.९१ टक्के) पेरणी झाली.या दोन मिळून ४ हजार २८० हेक्टरवर तृणधान्यांचा पेरा झाला आहे.

कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार परभणी जिल्ह्यात २०२३ पर्यतच्या ५ वर्षात तृणधान्यांचे सरासरी क्षेत्र ९ हजार ८३१ हेक्टर होते. त्यात ४ हजार ३८२ हेक्टरने झाली आहे. यंदा शुक्रवार (ता.२५) पर्यंत ज्वारी, बाजरी, मका या तृणधान्यांची सरासरी ५ हजार ४४९ पैकी १ हजार ३९५ हेक्टर (२५.६१ टक्के) पेरणी झाली आहे.

त्यात ज्वारीची ३ हजार ८५७ पैकी ७८९ हेक्टर (२०.४५ टक्के), बाजरीची ४९९ पैकी ९८ हेक्टर (१९.०६ टक्के), मक्याची ९८३ पैकी ५०१ हेक्टर (५१.०३ टक्के) पेरणी झाली. कडधान्यांमध्ये तुरीची ४२ हजार ६०२ पैकी ३४ हजार ४५३ हेक्टर(८०.८७ टक्के), मुगाची १७ हजार ६०० पैकी ५ हजार ६२४ हेक्टर (३१.९६ टक्के), उडदाची ६ हजार ४१३ पैकी १ हजार ८६६ हेक्टरवर (२९.१ टक्के) पेरणी झाली.

सोयाबीनची २ लाख ५४ हजार ३८२ पैकी २ लाख ६३ हजार ९६७ हेक्टरवर (१०३.७७ टक्के), तिळाची २०१ पैकी १०९ हेक्टर (५४.३ टक्के), कारळाची ५६ पैकी १६ हेक्टर पेरणी झाली. कपाशीची १ लाख ९१ हजार ९५४पैकी १ लाख ९१ हजार ३११ हेक्टर (९९.६६ टक्के) लागवड झाली आहे. जिल्ह्यात एकूण खरिपाची ५ लाख १८ हजार ४६८ पैकी ४ लाख ९८ हजार ६६६ हेक्टरवर (९६.१८) टक्के पेरणी झाली.

हिंगोली जिल्ह्यात एकूण तृणधान्यांची २ हजार ८८५ हेक्टरवर पेरणी झाली त्यात ज्वारीची २८ हजार २७४ पैकी २ हजार ५८६ हेक्टर (९.१५ टक्के), मक्याची ७२७ पैकी २५१ हेक्टर (३४.६१ टक्के) पेरणी झाली आहे. कडधान्यांमध्ये तुरीची ४४ हजार ३७८ पैकी ३२ हजार ३४ हेक्टर (७२.३४ टक्के), मुगाची ७ हजार ७८० पैकी ४ हजार २८० हेक्टर (५५.०२ टक्के), उडदाची १८हजार ३८२पैकी ३ हजार १७३ हेक्टर (१७.२८ टक्के) पेरणी झाली.

सोयाबीनची २ लाख ४८ हजार ८२७ पैकी २ लाख ७२ हजार ५२९ हेक्टर (९५.२ टक्के), भुईमुगाची ४ हेक्टर, तिळाची २३ हेक्टर, कारळाची ३१ हेक्टर पेरणी झाली. कपाशीची ३६ हजार ९११ हेक्टर (९१.४६ टक्के) लागवड झाली आहे. जिल्ह्यात एकूण खरीप पिकांची ४ लाख १० हजार ३९८ पैकी ३ लाख ५२ हजार २६ हेक्टरवर (८५.७८ टक्के) पेरणी झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

Farmer Compensation: भरपाईतही नव्या दरामुळे फटका

Leopard In Solapur: बिबट्यांची संख्या पन्नास की शंभर?

White Grub Infestation: हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

Onion Farmers: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT