Crop Survey Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Survey : अमरावती जिल्‍ह्यात नुकसानीचे होणार संयुक्‍त पंचनामे

Crop Survey Order Update : अमरावती जिल्ह्यात गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे ५३ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. वरुड तालुक्‍याला याचा सर्वाधिक फटका बसला. त्या पार्श्‍वभूमीवर वरुड तहसीलदारांनी संयुक्‍त पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.

Team Agrowon

Amravati News : अमरावती जिल्ह्यात गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे ५३ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. वरुड तालुक्‍याला याचा सर्वाधिक फटका बसला. त्या पार्श्‍वभूमीवर वरुड तहसीलदारांनी संयुक्‍त पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.

अमरावती जिल्ह्यात ९ व ११ एप्रिल रोजी गारपीट तसेच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. याचा फटका जिल्ह्यातील ५३ हजार हेक्‍टर क्षेत्रातील पिकांना बसला. त्यामध्ये सर्वाधिक नुकसान हे संत्रा बागायतदारांचे झाले. वरुड, मोर्शी तालुक्‍यांत सुमारे ४३ हजार हेक्‍टरवरील संत्रा बागा यामुळे प्रभावित झाल्याचे निरीक्षण प्राथमिक अहवालात नोंदविण्यात आले आहे.

नुकसान भरपाईकरिता महसूल व कृषी विभागाच्या माध्यमातून संयुक्‍त सर्वेक्षण होण्याची गरज राहते. त्यानुसार वरुड तहसीलदारांनी त्या संबंधिचे आदेश दिले आहेत. वरुड तालुक्‍यात अवकाळी पाऊस व गारपिटीच्या परिणामी रब्बी हंगामातील गहू, मका या पिकांसोबत त्यासोबतच संत्रा बागांचे नुकसान झाले.

आंबिया बहरातील लिंबाच्या आकारांच्या फळांची गळ झाली. राजुरा परिमंडलातील अमडापूर, राजुरा बाजार, वडाळा, वघाळ, वाडेगाव, काटी, वंडली, गाडेगाव, नांदगाव, हातुर्णा, बेलोरा (ताथोडे) या गावांना गारपीट, अवकाळी पावसाचा फटका बसला. १५ गावांत यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. याबाबत ॲग्रोवनमधून वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत प्रशासनाकडून संयुक्‍त पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Market : सोयाबीन यंदा तरी शेतकऱ्यांना हात देणार का?

Maharashtra Governor: आचार्य देवव्रत महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल

Agriculture Investment : शेतीसाठीची गुंतवणूक आणि निविष्ठा अनुदान

Heavy Rain Alert : राज्यात आज पाऊस दणका देणार ; कोकण, घाटमाथ्यावर ऑरेंज तर राज्यभरात येलो अलर्ट

Agricultural Trade : भारत १४० कोटी लोकांचा देश तरीही आमच्याकडून एक पोत मका घेत नाही?; ट्रम्प यांच्या मंत्र्याचा सवाल

SCROLL FOR NEXT