Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Jayshree Bhoj : कृषी विभागाचा अतिरिक्त कार्यभार जयश्री भोज यांच्याकडे

Upper Chief Secretary, Administration Department : कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांची बदली झाल्यानंतर सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार जयश्री भोज यांच्याकडे देण्यात आला आहे.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Agriculture Department : मुंबई : कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांची बदली झाल्यानंतर सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार जयश्री भोज यांच्याकडे देण्यात आला आहे. भोज सध्या पर्यटन विभागाच्या सचिव, तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत.

व्ही. राधा यांची दोन दिवसांपूर्वी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली होती. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या काही प्रस्तावांना राधा यांनी विरोध केल्याने त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर भोज यांची या विभागात नियुक्ती होईल, असे सांगितले जात होते. मात्र भोज यांनी पूर्णवेळ सूत्रे स्वीकारण्यास नकार दिल्याचे समजते. त्यामुळे नवीन सचिव येईपर्यंत कार्यभार देण्यात आला आहे.

मार्चमध्ये तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार यांची बदली झाल्यानंतर आचारसंहिता काळात शिक्षण विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन यांच्याकडे कार्यभार देण्यात आला होता. दोन महिन्यांपूर्वी नीती आयोगात प्रतिनियुक्तीवर असलेल्या व्ही. राधा यांची कृषी विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली होती. व्ही. राधा यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांची बदली करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Agriculture : शेती : व्यवसाय की समाजसेवा?

Milk Revolution : दुग्ध संस्थांच्या बळकटीसाठी श्वेतक्रांती २.०

Chili Value Chain : ‘कृषक स्वराज्य’ने उभारली मिरचीची मूल्यसाखळी

Maharashtra Assembly Election 2024 : छाननीत ९१७ अर्ज अवैध; लोकसभेच्या तुलनेत राज्यात ५० लाख मतदारांची भर

Spices Business : ‘चटका जिभेचा, मसाला आमचा’

SCROLL FOR NEXT