V. Radha : व्ही. राधा यांच्या बदलीवर अखेर शिक्कामोर्तब

Upper Chief Secretary, Administration Department : दोन महिन्यांपूर्वीच कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्त झालेल्या व्ही. राधा यांची अखेर सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी सोमवारी (ता. १२) बदली करण्यात आली आहे.
V. Radha
V. RadhaAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : दोन महिन्यांपूर्वीच कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्त झालेल्या व्ही. राधा यांची अखेर सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी सोमवारी (ता. १२) बदली करण्यात आली आहे. त्यांनी नवीन पदाचा कार्यभार राजगोपाल देवरा यांच्याकडून तत्काळ स्वीकारावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

व्ही. राधा यांच्या जागी पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्या बदलीचे आदेश उशिरापर्यंत निघाले नव्हते. कृषी विभागाकडून प्रस्तावित निविष्ठा वितरणाच्या प्रस्तावावरून कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि व्ही. राधा यांच्यात मतभेद झाल्याचे समजते. नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी वितरणाला राधा यांनी विरोध केला होता. मात्र ही सर्व प्रक्रिया निविदा पद्धतीने राबविली जाणार असूनही चुकीच्या पद्धतीने राधा यांनी विरोध केल्याचे मुंडे यांचे म्हणणे होते.

V. Radha
Agriculture Department : व्ही. राधा यांची बदली?

मतभेदानंतर राधा यांची बदली होईल, असे सांगितले जात होते. शुक्रवारी उशिरा बदलीचे आदेश निघण्याची शक्यता होती. मात्र व्ही. राधा यांनी कार्यभार स्वीकारून दोन महिन्यांच्या आतच त्यांची बदली केल्यास वेगळा संदेश जाईल, या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली.

व्ही. राधा यांनी कापूस, सोयाबीन आणि तेलबिया मूल्यसाखळी विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेला नॅनो युरिया डीएपी आणि फवारणी पंपांच्या वितरणाला स्थगिती दिली होती. त्या संदर्भात त्यांनी तोंडी आदेश दिले होते. यावरूनही कृषी मंत्रालय आणि सचिव कार्यालयामध्ये मतभेद झाले होते.

V. Radha
Principal Secretary : ‘कृषी’च्या प्रधान सचिवपदी व्ही. राधा

या योजनेतील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती तरीही या संदर्भात व्ही. राधा यांनी तोंडी आदेश देऊन फवारणी पंपांचे वितरण थांबविल्याने कृषी उद्योग महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ६७ हजार पंप पडून होते. हे पंप कधी वितरित करणार असेही मुंडे यांनी एका बैठकीत विचारले होते. तसेच तातडीने निविष्ठा वितरणाचे निर्देश दिले होते, मात्र त्यात प्रगती झाली नव्हती. त्यामुळे त्यांची बदली झाल्याचे समजते आहे.

बैठकांचा धडाका लावला होता...

व्ही. राधा यांनी यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात वरिष्ठ पदांवर काम केले आहे. कृषी विभागाचे सूत्रे स्वीकारण्यापूर्वी त्या केंद्र सरकारच्या निती आयोगात कार्यरत होत्या. कृषी विभागाचे सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी बैठकांचा धडाका लावला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com