Jalrath Agrowon
ॲग्रो विशेष

Jaljeevan Mission : परभणीत ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’चा जलरथ

Team Agrowon

Parbhani News : केंद्रीय जलशक्ती मंत्रालय नवी दिल्ली तसेच राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा -२, गाळमुक्त धरण,

गाळयुक्त शिवार अभियान याबाबत ग्रामीण भागात जागृती होऊन या योजनांच्या अंमलबजावणीत नागरिक सहभाग वाढावा या उद्देशाने परभणी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जलरथाद्वारे जनजागृती केली जात आहे, अशी माहिती जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक विजेंद्र मुंढे यांनी दिली आहे.

सोमवारी (ता. २६) पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या जलरथाचे उद्‌घाटन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. या वेळी मुंढे बोलत होते. प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) डॉ. संदीप घोन्सीकर, मृद्‍ व जलसंधारण विभागाचे अधिकारी राम अग्रवाल, मृद्‍ व जलसंधारण विभाग नोडल अधिकारी बी. के. पाटील,

उपविभागीय जलसंधारण अधिकारी (जिंतूर) ऋतुजा सुपेकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता किशोर लिपणे, भारतीय जैन संघटना पदाधिकारी झुंबरलालजी मुथ्था, रोहित गंगवाल, श्रीकांत अंबुरे, धर्मचंद गंगवाल, प्रदीप गोलेच्छा, अमृत नहार, पंकज कोठेवार, सचिन मुथ्था, मयूर झांजरी, सन्मती मोघले, विजय काला, पवन झांजरी, भारतीय जैन संघटना जिल्हा समन्वयक संदीप गवळी यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

जलरथाच्या माध्यमातून गावागावात जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा - २, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना आदी शासकीय योजना बाबत जिंगल्स, पोस्टर्स, माहितिपत्रक, तसेच नियुक्त केलेल्या समन्वयकांमार्फत या योजनांची माहिती दिली जाणार आहे.

तालुका स्तरावर नोडल अधिकारी म्हणून संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सनियंत्रण करणार आहेत. नागरिकांना देण्यात आलेल्या योजनांची माहिती मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये ऑनलाइन करण्यात येणार आहे. तसेच भारतीय जैन संघटनेचे समन्वयक यांनी यासाठी पुढाकार घेणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT