Jaljeevan Mission Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Jaljeevan Mission Scheme : जलजीवन मिशन योजना लोकचळवळ व्हावी

पाण्याअभावी ग्रामीण भागात महिलांना विविध अडचणीला सामोरे जावे लागते. या अडचणी कायमच्या सोडविण्याकरिता जल जीवन मिशन योजना सर्वांसाठी सुवर्णसंधी आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : जल जीवन मिशन योजना लोकचळवळ व्हावी, असे मत जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी व्यक्त केले.

जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामविकास संस्थेतर्फे हॉटेल इकोटेल येथे आयोजित दोन दिवसीय अनिवासी ग्रामस्तरीय भागधारक क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमात शुक्रवारी (ता. 17) उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

याप्रसंगी एस. डब्ल्यू. नेहरी, नरहरी शिवपुरे, शिवाजीराव घुगे, मच्छिंद्र पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले, की सरपंच हे जल, वायू, अग्नी, आकाश, पृथ्वी या पंचमहाभूताचे संवर्धक आहेत.

पाण्याअभावी ग्रामीण भागात महिलांना विविध अडचणीला सामोरे जावे लागते. या अडचणी कायमच्या सोडविण्याकरिता जल जीवन मिशन योजना सर्वांसाठी सुवर्णसंधी आहे.

सर्व ग्रामस्तरीय भागधारकांनी या योजनेची पारदर्शक, प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करावी व शाश्वत ग्रामविकास साधावा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकासचे सचिव नरहरी शिवपुरे यांनी केले.

प्रशिक्षण कार्यक्रमात मच्छिंद्र पंडित, शिवाजीराव घुगे, मुकुंद सेलमोहकर, बालाजी बिरादार, रवी सातदिवे यांनी जल जीवन विषयक संबंधित विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन बालाजी बिरादार यांनी केले तर आभार राहुल रगडे यांनी मानले.

या प्रशिक्षणास औरंगाबाद तालुक्यातील वरुड काझी परिसरातील बारा गावातील सरपंच, पाणीपुरवठा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, स्वेच्छागृही यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संबंधित कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अर्चना पवार, संदीप शिंदे, निवृत्ती घोडके यांनी अथक परिश्रम घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 2026 Update: 'पीएम किसान'साठी फार्मर आयडी, ई-केवायसी बंधनकारक, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Natural Farming: जालना जिल्ह्यात २७०० हेक्टरवर नैसर्गिक शेती

Dr. Madhav Gadgil: निसर्ग रक्षणाचा द्रष्टा मार्गदर्शक!

Natural Farming: नैसर्गिक शेती की संसाधनांचे केंद्रीकरण

Sanitary Pads: सॅनिटरी पॅडमध्ये शेवग्याचा वापर ठरेल गुणकारी

SCROLL FOR NEXT