Smart Electricity Meter Agrowon
ॲग्रो विशेष

Smart Electricity Meter : नागपुरात फडणवीसांच्या पोस्टरला काळे फासले, बावनकुळेंच्या गाडीवर भिरकावला बूट

Nagpur Opposed to Smart Electricity Meters : राज्याच्या कानाकोपऱ्यात स्मार्ट वीज मीटरला तीव्र विरोध होत आहे. यादरम्यान नागपुरमध्ये स्मार्ट वीज मीटरवरून जय विदर्भ पार्टी आक्रमक झाली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात स्मार्ट वीज मीटरला तीव्र विरोध होत आहे. असे असतानाही राज्य सरकारकडून ते सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. यावरून राज्याच्या कानाकोपऱ्यात स्मार्ट मीटरच्या विरोधात शेतकरी संघटना रस्त्यावर उतरत आहेत. विरोधक देखील यावरून सरकारवर निशाना साधत आहे. यादरम्यान नागपुरमध्ये मंगळवारी (ता.२५) जय विदर्भ पार्टीने ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला काळे फासत निषेध व्यक्त केला. तसेच स्मार्ट मीटर रद्द करण्याची मागणी करत जोरदार नारेबाजी केली. याचवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गाडीवर बूट फेकण्यात आला. त्यामुळेपोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले.

राज्यात सध्या अनेक प्रश्नावरून शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. यात दुधाच्या प्रश्नासह शक्तीपीठ महामार्ग आणि स्मार्ट प्रीपेड मीटरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या तिन्ही प्रश्नावरून सरकारला तीव्र विरोध केला जात आहे. यादरम्यान नागपुरमध्ये जय विदर्भ पार्टीच्या वतीने स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध करण्यात आला. येथील जुना काटोल नाका चौकात महावितरणच्या विद्युत भवन कार्यालयासमोर मंगळवारी जोरदार आंदोलन केले. यावेळी जय विदर्भ पार्टीच्या कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी फडणवीस यांच्या बॅनरवर शाही फेकत काळे फासले. त्यामुळे वातावरण तंग झाले होते.

दरम्यान आंदोलनस्थळाजवळून जाणाऱ्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या गाडीवर एका आंदोलकाने गाडीवर बुट भिरकावला. तसेच धावत्या गाडीच्या दिशेने धाव घेत बावनकुळेंना आंदोलनस्थळी येण्यास भाग पाडले. यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. तर फडणवीस यांच्या बॅनरला काळे फासण्यासह बावनकुळेंच्या गाडीवर बूट भिरकावल्याने पोलीसांनी काही आंदोनकांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले.

बावनकुळे यांनी आंदोलकांना शांत करताना, ऊर्जामंत्र्यांनी भाजपच्या बैठकीत स्मार्ट प्रीपेड मीटर योजना तात्पुरती स्थगित केल्याचे जाहीर केले. तसेच सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता पुढेही ही योजना लागू होणार नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

यावेळी सध्या सुरू असणारे डिजिटल मीटर योग्य असून ते बदलण्यासह स्मार्ट मीटरचा घाट सरकारने घालू नये. स्मार्ट मीटर नको अशी जनतेची मागणी आहे. याआधी देखील गुजरात, उत्तर प्रदेश, पुणे (मगरपट्टा), मुंबई (भांडूप, खारघर) स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेचा प्रयोग अयशस्वी झाला आहे. त्यामुळे ती राज्यात लागू न करता रद्द करावी, अशी मागणी जय विदर्भ पार्टीच्यावतीने उपाध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी केली आहे.

तसेच जनतेचा रोष लक्षात घेऊन ती माथ्यावर मारल्यास पुढे तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देखील मासुरकर यांनी दिला आहे. तसेच पार्टीच्या वतीने मुख्य अभियंता दिलीप दोडके यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT