Jaggery Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Jaggery Rate : गुळाचे दर क्विंटलला ४०० रुपयांनी सुधारले

Jaggery Market : यंदाच्या हंगामात गुळाला चांगला दर मिळत असल्याने गूळ उत्पादकांमध्ये समाधान पसरले आहे. पंधरवड्यापूर्वी असणारे मंदीचे मळभ दूर झाले असून, गुळाच्या दरात क्‍विंटलला ४०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

राजकुमार चौगुले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Jaggery Producer :
कोल्हापूर ः यंदाच्या हंगामात गुळाला चांगला दर मिळत असल्याने गूळ उत्पादकांमध्ये समाधान पसरले आहे. पंधरवड्यापूर्वी असणारे मंदीचे मळभ दूर झाले असून, गुळाच्या दरात क्‍विंटलला ४०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे. सध्या येथील बाजार समितीत येणाऱ्‍या गुळास प्रतिक्विंटल ३८०० ते ४५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

प्रथम दर्जाच्या गुळास क्वचित प्रसंगी ४९०० रुपयांपर्यंत दर जात आहे. गेल्‍या वर्षीच्या तुलनेत यंदा ३५ टक्‍के गुऱ्हाळघरे कमी प्रमाणात सुरू झाली आहेत. यामुळे गुळाचे उत्पादन कमी होत आहे. याचाच परिणाम आवक घटण्यावरही झाला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत अडीच लाख रव्‍यांनी आवक घटली आहे. उसाप्रमाणे यंदाचा गूळ हंगामही लवकर संपण्याची शक्यता आहे. यामुळे गुजरातमधील व्यापाऱ्यांनी शीतगृहासाठीही खरेदी सुरू केली आहे.

तसेच संक्रातीसाठीही गूळ खरेदी करण्यास व्‍यापारी प्राधान्य देत असल्‍याने या सर्व बाबींचा एकत्रीत परिणाम गूळदर सुधारण्यावर झाला आहे. सध्या बाजार समितीत ३० ते ३५ हजार गूळ रवे विक्रीसाठी येत आहेत.

येथील बाजार समितीत वर्षभर गुळाचे सौदे सुरू असतात. यंदा पावसाळा कमी असल्याने पंधवरवड्याचा कालावधी वगळता बाजार समितीत एक दिवसाआड गुळाचे सौदे होत होते. मुख्‍य हंगाम दिवाळीनंतर सुरू झाला. यंदा पाऊस फारसा नसल्याने गुऱ्हाळे सुरू होण्‍यास निसर्गाचा अडथळा आला नाही.

मजूर टंचाईमुळे मात्र अनेक गुऱ्हाळघरे सुरू होऊ शकली नाहीत. दरवर्षी १०० ते १२५ गुऱ्‍हाळे सुरू होतात. यंदा मात्र ही संख्‍या ८० पर्यंत घसरली. याचा साहजिकच परिणाम गुळाची आवक कमी होण्यावर झाला. जसा हंगाम पुढे जाईल तशी गुऱ्हाळघरे जादा प्रमाणात सुरू होतील, अशी अटकळ होती. पण अद्याप जितक्‍या संख्येने गुऱ्हाळघरे सुरू होतील तितक्‍या प्रमाणात सुरू झाली नाहीत यामुळे बाजार समितीत गुळाची आवक गेल्‍या वर्षीच्या तुलनेत कमी आहे.

पुढील दोन महिनेही अशीच स्थिती रहाणार असल्‍याने गुळाची आवक फारशी होणार नाही, असे गृहीत धरून व्यापाऱ्यांनी जादा खरेदीला प्राधान्य दिल्याने दरातही वाढ होत असल्‍याचे चित्र आहे.

गुळाची सोमवारची (ता. २५) दरस्‍थिती (प्रतिक्विंटल, रुपयांमध्‍ये)
दर्जा किमान कमाल
     
१ ४८०० ४९००          
२ ४२०० ४६००
३ ३९०० ४१९०
४ ३७०० ३८९०



कर्नाटकातही गुऱ्हाळांची संख्‍या घटली
गुजरातमधील व्यापारी तेथील शीतगृहात गूळ ठेवण्यासाठी कोल्हापूरबरोबर कर्नाटकातूनही गूळ मागवतात. यंदा मजूरटंचाईचा फटका कर्नाटकातील गुऱ्हाळघरांनाही बसला आहे.

या राज्यातील पन्नास टक्के गुऱ्हाळघरे सुरू झाली नाहीत. यामुळे व्यापारी तेथील तूट भरून काढण्यासाठी कोल्‍हापूरच्या गुळाला मागणी नोंदवत आहेत. याचा परिणाम गुळाचे दर वाढण्यावर झाला आहे.


गेल्या पंधरवड्यापासून गुळाच्या दरात सातत्याने सुधारणा होत आहे. गुऱ्‍हाळांची घटती संख्या व रोडावलेली आवक यामुळे दरात वेगाने वाढ झाली. येणाऱ्या काही दिवसांत गुळाचे दर चांगले राहतील, अशी शक्‍यता आहे.
- के. बी. पाटील, गूळ विभाग प्रमुख, कोल्हापूर बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : सोयाबीन खरेदीची मुदत निम्मी संपली मात्र २ टक्केही खरेदी नाही; आतापर्यंत केवळ २४ हजार टनांची खरेदी पूर्ण

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी नरमाई ; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आले दर ?

Farmer Producer Company : नवअनंत शेतकरी कंपनीची वाटचाल आशादायी

Maharashtra Election 2024 : मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला तारणार?

Hawaman Andaj : थंडीमुळे राज्याला हुडहुडी; राज्याच्या बहुतांशी भागातील कमान तापमानात घट कायम

SCROLL FOR NEXT