Kolhapur News : हिरण्यकेशी नदीतील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या तालुक्याच्या पूर्व भागातील १४ गावांत नळ योजनांच्या जॅकवेलला पाणीच पोहोचत नसल्याने आता शेतीला राहू द्या, किमान प्यायला तरी पाणी द्या, अशी आर्त हाक देण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
पाण्याचे आवर्तन सुरू असले तरी पाटबंधारे खात्याने लागू केलेला उपसाबंदी आदेश महावितरणच्या यंत्रणेकडून फाट्यावर बसवल्याने उपसा कायम आहे. परिणामी, पूर्वेकडील गावांच्या जॅकवेलपर्यंत पाणी जाण्यास अपेक्षित दाब मिळालेला नाही.
चित्री व आंबेओहोळ प्रकल्पातील पाण्याचे शेवटचे आवर्तन २१ मेपासून हिरण्यकेशी नदीत सुरू केले आहे. तालुक्याच्या पूर्वेकडील गावांच्या योजनांना वेळेत पाणी मिळावे म्हणून पाटबंधारे खात्याने २२ मेपासून दोन्ही तिरावर उपसाबंदी लागू केली आहे.
महावितरणलाही या आदेशाची प्रत दिली आहे; परंतु ज्या विभागांच्या पाणी परवान्यावर महावितरण उत्पन्न मिळवते, त्याच पाटबंधारेला टंचाईस्थितीत महावितरणचे सहकार्य मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. उपसाबंदीकडे महावितरणची डोळेझाक होत असल्याची चर्चा आहे.
१९ मे रोजी आवर्तन जाहीर केले होते. तेव्हापासूनच उपसाबंदीही लावली होती. या अचानकच्या बंदीला किसान संघाने विरोध केल्याने बंदी तीन दिवसांसाठी उठवली. दुसरीकडे आवर्तनही थांबवले. परिणामी पूर्व भागातील योजनांचा पाण्याचा ताण वाढला.
जॅकवेलपर्यंत पाणीच पोहोचत नाही. नूल, मुगळी, हिटणी, मुत्नाळ, खणदाळ, हसूरचंपू, हेब्बाळ, नांगनूर, अरळगुंडी, कडलगे, इदरगुच्ची, चंदनकूड, हलकर्णी, बसर्गे या गावांचे जॅकवेल कोरडे पडले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.