Dr. Ankush Chormule Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Health : जमिनीच्या आरोग्यावर लक्ष देणे गरजेचे

Dr. Ankush Chormule : जमिनीचे आरोग्य, योग्य वाणाची निवड, लागवडीच्या पद्धतीसह ऊस उत्पादनातील प्रत्येक टप्प्यावर योग्य नियोजनावर भर दिल्यास ऊसाचे एकरी शंभर टनाहून अधिक उत्पादन शक्य आहे.

Team Agrowon

Solapur News : जमिनीचे आरोग्य, योग्य वाणाची निवड, लागवडीच्या पद्धतीसह ऊस उत्पादनातील प्रत्येक टप्प्यावर योग्य नियोजनावर भर दिल्यास ऊसाचे एकरी शंभर टनाहून अधिक उत्पादन शक्य आहे, असे प्रतिपादन ऊसतज्ज्ञ डॉ. अंकुश चोरमुले यांनी बीबीदारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथे केले.

बीबीदारफळ येथील लोकमंगल साखर कारखान्यावर ऊसपीक परिसंवादात डॉ.चोरमुले बोलत होते. शेतीनिष्ठ शेतकरी सोमनाथ हुलगे, लोकमंगल साखर कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख, लोकमंगल कारखान्याचे संचालक प्रशांत पाटील, सरव्यवस्थापक सुनील घालमे, प्रशासनाधिकारी विवेक पवार या वेळी उपस्थित होते.

डॉ. चोरमुले म्हणाले, की ती उसाच्या सुधारित वाणाची निवड करा, त्यासाठी ८६०३२,१५०१२,१३००७ हे वाण उत्तम आहेत, ऊस लागवडीत जमिनीच्या आरोग्याला महत्त्व आहे. शेणखत, कोंबडी खत, गांडूळ खत, हिरवळीचे खत याचा पुरेपूर वापर करावा, सरीचे अंतर पाच फुटापेक्षा जास्त ठेवावे, उसाची लागवड रोपपद्धतीने करावी, थेट बेण्याने लागवड करताना एक डोळा पद्धत वापरावी,

पाटाने पाणी देण्याऐवजी ठिबक सिंचनाचा वापर करावा. वाढीच्या प्रत्येक वेळी रासायनिक खताची योग्य मात्रा द्यावी, यासाठी पारंपरिक आणि रासायनिक खत यांचा मध्य साधावा. खोडवा उत्पादनात पाचटाचे महत्त्व अनन्यसाधारण असून उसाचे पाचट

कुठल्याही परिस्थितीत जाळू नये, असेही ते म्हणाले. श्री. हुलगे यांनी त्यांचे स्वतःच्या शेतीतले अनुभव सांगितले. या वेळी उसाचे प्रतिएकरी जादा उत्पन्न काढणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शेती अधिकारी ज्ञानदेव मारकड, वडाळाचे चिमन साठे, प्रदीप काळे, सचिन ननवरे, विजय यादव, भारत जगदाळे, शहाजी देशमुख, अंबादास ढेरे, दादाराव वाघमोडे आदी उपस्थित होते.

‘लोकमंगल’ मदत करेल

कारखान्याचे अध्यक्ष देशमुख म्हणाले, उसाचा उत्पादनाच खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून, यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. एकरी उत्पादन वाढ केल्याशिवाय पर्याय नाही, शेतकऱ्यांनी तज्ज्ञ शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन उसाच्या लागवड खर्च कमी करावा, यासाठी लोकमंगल शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत करील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT