Israel-Iran War Agrowon
ॲग्रो विशेष

Israel-Iran War: ईस्त्राईल इराण युध्दाचा भारतालाही फटका; शेतीमालाची निर्यात प्रभावित होण्याचा धोका

Indian Exports: इस्त्राईल आणि इराण यांच्यातील युध्दाची स्थिती आणखी चीघळल्यास इराणमध्ये पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते आणि पेमेंटची समस्या निर्माण होऊ शकते.

Anil Jadhao 

Pune News: इस्त्राईल आणि इराण यांच्यातील युध्दाची स्थिती आणखी चीघळल्यास इराणमध्ये पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते आणि पेमेंटची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे भारतातून इराणला होणाऱ्या शेतीमालाच्या निर्यातीवरही परिणाम होऊ शकतो.

भारतातून इराणला सोयापेंड, बासमती तांदूळ, हरभरा, साखर, शेंगदाणा, तीळ तसेच हळद आणि जिऱ्यासारख्या मसाल्यांची निर्यात होत असते. भारत जगातील सर्वात मोठा तांदूळन निर्यातदार देश आहे. मागील काही वर्षात भारताची बासमती तांदळाची निर्यातही वाढली आहे.

इराण हा भारताच्या बासमती तांदळाचा मोठा ग्राहक आहे. पण सध्या सुरु असलेली युध्दाची स्थिती आणखी चिघळली आणि जास्त काळ चालली तर बासमतीच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो, पेमेंटही उशीरा मिळू शकते, अशी भीती निर्यातदारांनी व्यक्ती केली.

त्यामुळे इराणसोबतच्या व्यापारात अडथळे निर्माण झाल्यास भारतालाही फटका बसू शकतो.
इराणला भारतातून सोयापेंडचीही मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते. भारताने २०२४-२५ या आर्थिक वर्षात इराणला १ लाख ३८ हजार टन सोयापेंडची निर्यात केली होती.

तर चालू हंगामात ऑक्टोबर ते मे दरम्यान २३ हजार टनांचीच निर्यात झाली आहे. मागील २ महिन्यात निर्यात घटली आहे. आता युध्दाने समस्या वाढल्या तर सोयापेंड निर्यातीवर आणखी परिणाम होऊ शकतो. 

इराणला शेतीमालाची निर्यात (टनांमध्ये)

शेतीमाल…२०२३-२४…२०२४-२५
तांदूळ…६८५९०४…८६३५४९
साखर…५४३१…२२१९४
शेंगदाणा…११५८५…९८२२
हळद…५४४४…८०५८
सोयापेंड…३११६३८…१३८८१५
काबुली हरभरा…४९४९…३४३८
जीरा…११८०…३१६१
तीळ…३३७९…२११०

भारतातून इराणला शेतीमालाची निर्यात सुरु आहे. मात्र पेमेंटची समस्या जाणवत आहे. सध्या इराणधील शेतीमाल आयातदार दुबईमध्ये असलेल्या खात्याद्वारे आणि इतर आंतरराष्ट्रीय माध्यमांतून पेमेंट करत आहेत. परंतु ही परिस्थिती अशीच राहीली तर पुढे समस्या वाढू शकतात, असे निर्यातदारांनी सांगितले. 
- राहूल चौहान, संचालक, आयग्रेन इंडिया  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Disease : ‘लम्पी’ लसीकरण सुरू; तूर्त आजारी पशूंची नोंद नाही

Soybean Sowing : मराठवाड्यात २२ लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी

Tree Plantation: कोटीच्या कोटी वृक्ष लागवड उद्दिष्टांची उड्डाणे?

Interview with Rajendra Jadhav: सोयाबीन, कापूस, तूर दबावात राहण्याची चिन्हे

Krishi Karma Vidya: एका ग्रंथाचा शोध आणि बोध

SCROLL FOR NEXT