Free Electricity Demand Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Federation Agitation : इरिगेशन फेडरेशनचे आज ठिय्या आंदोलन

Free Electricity Demand : सर्वच शेती पंपधारक शेतकरी व सहकारी पाणीपुरवठा संस्थांना सरसकट मोफत विजेचा लाभ मिळावा. तसेच शेतीपंपाची मागील थकबाकी निरंक करावी, या मागणीसाठी गुरुवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार आहे.

Team Agrowon

Kolhapur News : सर्वच शेती पंपधारक शेतकरी व सहकारी पाणीपुरवठा संस्थांना सरसकट मोफत विजेचा लाभ मिळावा. तसेच शेतीपंपाची मागील थकबाकी निरंक करावी, या मागणीसाठी गुरुवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार आहे. ही माहिती राज्य इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील-किणीकर व माजी आमदार संजय घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आंदोलनात आमदार सतेज पाटील यांच्यासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील शेतीपंपधारक व सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे सभासद सहभागी होतील. शासनाने पावसाळी अधिवेशनात साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज देण्याची घोषणा केली.

त्यानुसार या ग्राहकांची बिले येत्या २७ मार्च २०१७ पर्यंत माफ होतील. मात्र साडेसात अश्‍वशक्तीवरील शेतीपंपधारकांचा मोफत योजनेत समावेश नाही. राज्यातील सर्वच सहकारी पाणीपुरवठा संस्थांमध्ये लाखो अल्पभूधारक शेतकरी सभासद आहेत. अशा संस्थांच्या एकूण अश्‍वशक्तीचा विचार करता प्रत्येक शेतकऱ्याला १ ते २ अश्‍वशक्ती वीज वाट्याला येते.

याचा विचार करून संबंधित संस्थांना मोफत वीज मिळाली नाही तर त्या संस्थांवर अन्याय होईल, तो होऊ नये यासाठी संस्थांचा मोफत वीज योजनेत सहभागी करावा. ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी नदीपासून लांब आहेत ज्यांच्या कूपनलिकेची पाणीपातळी अतिखोल आहे, अशा शेतकऱ्यांना १० ते २५ अश्‍वशक्तीचे शेतीपंप वापरावे लागतात.

अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त वीजबिल भरावे लागते. त्यामुळे मोफत वीज या योजनेत समावेश करावा, अशी मागणी आहे. वीजबिलापोटी किती निधी येतो, तसेच प्रत्यक्ष वीजबिले किती भरली जातात, याचे ऑडिट करावे. ते जाहीर करावे, असे आवाहनही विक्रांत पाटील व बाबासाहेब देवकर यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT