Tribal Education Agrowon
ॲग्रो विशेष

Tribal Education : आदिवासी विद्यार्थ्यांत कृषी, ग्रामविकास ज्ञानाची पेरणी

शेतकऱ्यांच्या सहभागातून उभी केलेल्या या कंपनीचा विस्तार आणि उत्पादने यांची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली.

Team Agrowon

Nashik Tribal News : ग्रामीण आदिवासी भागातील मुलांमध्ये (Tribal Student Education) नेतृत्वगुण व व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊन त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळावी या उद्देशाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक (Rotary Club Of Nashik) यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त विद्यापीठात ‘रायला महोत्सव २०२३’चे (Rayala Festival) आयोजन करण्यात आले होते.

या माध्यमातून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये कृषी व ग्रामविकास (Rural Development) ज्ञानाची पेरणीच झाली आहे.

जिल्ह्यातील आश्रम शाळांतील तब्बल १०० विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते. महोत्सवात विद्यार्थ्यांना मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान मुलांची सह्याद्री फार्म्स कंपनीला भेट घडवून आणली.

शेतकऱ्यांच्या सहभागातून उभी केलेल्या या कंपनीचा विस्तार आणि उत्पादने यांची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. कम्युनिटी सर्व्हिस संचालक तथा कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ हेमराज राजपूत हे ग्रामविकासात कृषी विज्ञान केंद्राचे योगदान याविषयी मार्गदर्शन केले.

सतीश मंडोरा, विक्रम बालाजीवाले, अनिरुद्ध अथणी आणि डॉ. श्रिया कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. रोटरीचे प्रांतपाल आनंद झुनझुनवाला यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रफुल बरडिया, कम्युनिटी सर्व्हिस संचालक तथा रायला महोत्सवाचे समन्वयक हेमराज राजपूत, संतोष साबळे, अनिल सुकेनकर, सतीश मंडोरा, डॉ. अक्षिता बुरड उपस्थित होते. कृषी प्रक्षेत्र भेट, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, बुद्धिप्रेरक खेळ, ध्यानयोग, क्रीडा मार्गदर्शन, झुम्बा, दृकश्राव्य स्टुडिओ भेट असे विविध उपक्रम पार पडले.

आता चांगले शिक्षक घेऊन यश मिळवायचे आणि आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे असा निर्धार सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

दिलीपसिंह बेनिवाल, विनायक आणि ऊर्मिला देवधर, कमलाकर आणि कीर्ती टाक, डॉ. नागेश मदनुरकर, मधुकर गवळी आदी उपस्थित होते. दमयंती बरडिया यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन सुरेखा राजपूत यांनी केले.

११ वीची विद्यार्थिनी भाग्यश्री बरड विजेती ठरली असून तिच्या पुढील शिक्षणाचे पालकत्व रोटरीचे पदाधिकारी तथा माजी परिवहन अधिकारी सतीश मंडोरा यांनी स्वीकारले.

‘सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारून यशाकडे झेप घ्या’

सध्याच्या स्पर्धेच्या युगात ज्ञानाची शिदोरी अंगी करताना जीवनात आपल्याला काय व्हायचे आणि काय करायचे याचे ध्येय निश्चित करायला पाहिजे.

यासाठी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून यशाकडे झेप घेतल्यास जीवनात यशस्वी होता येते, असे मत आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

SCROLL FOR NEXT