melghat drought agrowon
ॲग्रो विशेष

Melghat Drought : उन्हाच्या झळा तीव्र, मेळघाटात २० टँकरने पाणीपुरवठा

Water Crisis Amravati : यंदा सुरुवातीपासूनच भीषण पाणीटंचाईचे संकेत मिळाले होते. मार्च महिन्याच्या अखेरीस चिखलदरा तालुक्यातील काही गावांना टॅंकर सुरू करण्यात आले.

Team Agrowon

Melghat Water Crisis : मे महिना सुरू होताच उन्हाची तीव्रतासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातसुद्धा हीच परिस्थिती असून, गावकऱ्यांची तहान भागविण्यासाठी २० टॅंकर सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे, दोन दिवसांनी खिरपाणी या गावाला सुद्धा टॅंकर लागणार असल्याने टॅंकरच्या संख्येत वाढ होणार आहे.

यंदा सुरुवातीपासूनच भीषण पाणीटंचाईचे संकेत मिळाले होते. मार्च महिन्याच्या अखेरीस चिखलदरा तालुक्यातील काही गावांना टँकर सुरू करण्यात आले. त्याची तीव्रता वाढत गेल्याने आता मेमध्ये टँकरची संख्या २० पर्यंत गेली आहे. आलाडोहला दोनच दिवसांपूर्वी टँकर सुरू झाला असून, आणखी दोन दिवसांनी खिरपाणी या गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून टंचाईवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. चार दिवसांपूर्वीच पाणीटंचाईच्या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांकडून बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. या बैठकीत संबंधितांना सूचनादेखील करण्यात आल्या, मात्र टंचाई निर्मूलनाच्या कामात अडथळा असलेल्या जलजीवन मिशनमधील निकृष्ट कामांचा मुद्दा कुठेच चर्चेला आला नाही.

...या गावांना लागले टँकर

आकी, खडीमल, मोथा, लवादा, तारुबंधा, गौलखेडा बाजार, महेरियम, बहाद्दरपूर, गवळीढाणा, आलाडोह, सावंगी मग्रापूर, खिरपाणी.

खासगी विहिरींचे अधिग्रहण

वाढत्या टँकर संख्येसोबतच अधिग्रहित करण्यात आलेल्या खासगी विहिरींची संख्या सुद्धा वाढली आहे. सद्यःस्थितीत चिखलदरा तालुक्यात १९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून त्यापैकी १० विहिरींचा वापर टँकरकरिता तर नऊचा उपयोग ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी केला जात आहे. विहिरींचे अधिग्रहण सुद्धा वाढण्याचे संकेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ranjangaon Khuri Rain Damage: रांजणगाव खुरी येथे वादळी वाऱ्याचा तडाखा

Vaijapur APMC Controversy: 'हायड्रॉलिक ट्रॅक्टर'ने माल खाली करूनही हमाली व तोलाईची कपात; शेतकरी संघटना आक्रमक!

Kharif Season Plan: खरीप हंगामासाठी विभागीय भरारी पथक स्थापन

Low Water Crop Sowing: शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर येणाऱ्या वाणाची पेरणी करावी; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना बोनसची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT