Agriculture Department agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : आंबा व काजू पिकावरील रोगांचे निदान होणार एका क्लिकवर, रत्नागिरी कृषीविभागाचा उपक्रम

Mango Cashew Agriculture : आंबा आणि काजू कीड, रोग व्यवस्थापनाच्यादृष्टीने पाऊल टाकले पाहिजे, यासाठी रत्नागिरी कृषी विभागाकडून विशेष प्रकल्प राबवला जात आहे.

sandeep Shirguppe

E Pest Surveillance : रत्नागिरीमध्ये कृषी चिकित्सालय फळ रोपवाटिका येथे बुधवारी (ता०१) कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी अचानक उद्भवणाऱ्या कीडरोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन उत्पादनावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन कीड, रोग व्यवस्थापनाच्यादृष्टीने पाऊल टाकले पाहिजे, यासाठी रत्नागिरी कृषी विभागाकडून विशेष प्रकल्प राबवला जात आहे.

या प्रकल्पांतर्गत पिकावरील कीडरोगांची निरीक्षणे नोंदवली जाणार आहे. त्यावर आधारित पीक संरक्षण सल्ला देण्यासाठी राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन संशोधन केंद्र, नवी दिल्ली यांनी विकसित केलेले ई-पेस्ट सर्व्हीलन्स (e pest surveillance) या ऑनलाइन संगणक प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. ही माहिती शेतकऱ्यांना एका क्लिकवर मिळू शकणार आहे. असे रत्नागिरी उपविभागीय कृषी अधिकारी फिरोज शेख यांनी सांगितले.

विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा कृषी अधीक्षक शिवकुमार सदाफुले यांच्या मार्गदर्शनाखाली फलोत्पादन पिकावरील कीडरोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत रत्नागिरी उपविभागामधील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच आंबा व काजू फळपिक उत्पादक निश्चित प्लॉटधारक शेतकऱ्यांसाठी उपविभागस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

नारळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांनी आंबा व काजूपिकावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन याबाबत सखोल माहिती दिली. तर लांजा कृषी विज्ञानकेंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सुदेशकुमार चव्हाण यांनी आंबा व काजूपिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. मंडळ कृषी अधिकारी प्रदीप भुवड यांनी हॉर्टसॅप अंतर्गत सव्र्व्हेक्षण करावयाची पद्धती याबाबत मार्गदर्शन केले.

उपक्रमाची उद्दिष्टे

मोबाईल अॅप्लिकेशन विकसित करण्याचे काम सुरू असून, ते लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. तोपर्यंत सध्याच्या ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे निरीक्षण नोंदणी करून त्यावर आधारित पीक संरक्षण सल्ले शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.

कीडरोगांबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून वेळीच व्यवस्थापन करणे, वारंवार येणाऱ्या रोगांबाबत सांख्यिकी माहिती संकलित करणे व कायमस्वरूपी व्यवस्थापनाबाबत कृषी विद्यापिठांच्या साह्याने शिफारशी निश्चित करणे व प्रादुर्भावाबाबत शेतकऱ्यांना वेळीच उपाययोजना सुचवणे, अशी उद्दिष्टे या योजनेची असणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Rain : नद्यांचे पाणीपात्राबाहेर; कोल्हापुरात पावसाची उघडझाप

Lumpy Skin Disease: लम्पी नियंत्रणाची त्रिसूत्री- आहार, स्वच्छता आणि औषधोपचार

Onion Policy : राज्य सरकारला खरोखरच कांदा धोरण ठरवायचे आहे का?

eSakal No 1: 'ई-सकाळ'ची पुनश्च एकदा गगनभरारी ! २१.२ मिलियन वाचकांच्या पंसतीची मोहोर कायम

Soil Testing : नाशिक जिल्ह्यात १५ ग्रामस्तरीय मृद परीक्षण केंद्रांची होणार उभारणी

SCROLL FOR NEXT