Satara News: सातारा जिल्ह्यातील शेती अधिक स्मार्ट, अचूक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दिशेने सातारा जिल्ह्याने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. जिल्हा नियोजन समिती आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नावीन्यपूर्ण आधुनिक फळबाग उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित फळबाग विकास प्रकल्प’ योजनेअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित युनिट्सच्या स्थापनेला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. या प्रायोगिक प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील सुमारे ७२५ हेक्टर क्षेत्रावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फळबागांचे व्यवस्थापन केले जाणार आहे..कृषी विभागाकडून यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना फळपिकांची स्थिती, हवामानातील बदल, मातीतील ओलावा, तसेच कीड-रोगांचा प्रादुर्भाव याबाबत रिअल-टाइम माहिती उपलब्ध होणार आहे. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने मिळणाऱ्या विश्लेषणामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर, खत व औषधांच्या खर्चात बचत आणि उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात येत आहे..AI In Agriculture: सरकारने ‘एआय’ तंत्राकडे गांभीर्याने पाहण्याची गरज.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे या प्रकल्पाबाबत माहिती देताना म्हणाल्या, ‘‘एआय आधारित यंत्रणेमुळे पिकांचे सतत निरीक्षण करणे आणि अचूक निर्णय घेणे शक्य होणार आहे. विशेषतः उच्च मूल्य असलेल्या फळपिकांच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.’’.प्रकल्पात सहभागी होणाऱ्या इच्छुक शेतकऱ्यांना फळपीक उत्पादन वाढ, कीड-रोग व्यवस्थापन, निर्यात दर्जाचे उत्पादन, तसेच कृषी क्षेत्रातील एआय तंत्रज्ञानाच्या वापराबाबत विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच कीड नियंत्रणासाठी फ्रूट फ्लाय ट्रॅप्स- ल्युर्ससह आवश्यक तांत्रिक साह्यही उपलब्ध करून दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेती ‘स्मार्ट’ आणि ‘प्रिसिजन’ शेतीकडे वाटचाल करत असून, डिजिटल कृषी व्यवस्थेच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे, अशी प्रतिक्रिया तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे..Ai in Agriculture: ‘एआय’ ऊस शेतीचा महाराष्ट्राबाहेरही विस्तार.१२ गावांची निवडहा प्रकल्प जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील एकूण ७२५ हेक्टर क्षेत्रावर राबविण्यात येणार असून, त्यामध्ये कोरडवाहू क्षेत्रातील सलग फळबागांचा समावेश आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील पाडळी, खटाव तालुक्यातील कलेढोण, निमसोड, फलटण तालुक्यातील धुमाळवाडी, गिरवी, बोडकेवाडी, निरगुडी, माण तालुक्यांतील मार्डी, हवालदारवाडी, कारखेल, भाटकी आणि जावळी तालुक्यातील आखाडे या गावांचा समावेश आहे..कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर हा भविष्यातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि शाश्वत शेती पद्धती उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.संतोष पाटील, जिल्हाधिकारी, सातारा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.