Chana Pest Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Pest Management : हरभरा पिकातील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

Chana Pod Borer : किडीमुळे होणारे पिकाचे नुकसान कमी करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

Team Agrowon

अमोल ढोरमारे

Chana Pest Management : हरभरा हे रब्बी हंगामात मुख्य डाळवर्गीय पीक असून, मराठवाडा विभागात या वर्षी हरभऱ्याखालील क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे. हरभरा पिकाच्या यशस्वी उत्पादनातील सर्वांत मोठी अडचण म्हणजे घाटे अळी. तिचे शास्त्रीय नाव - Helicoverpa armigera असे असून, ती Noctuidae कुळातील आहे.

ही बहुभक्षीय कीड असून, १८१ पेक्षा अधिक पिकावर आपला उदरनिर्वाह करते. तिला अमेरिकन बोंड अळी, शेंगा पोखणारी अळी व घाटे अळी अशा विविध नावाने ओळखतात. या किडीमुळे होणारे पिकाचे नुकसान कमी करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

जीवनक्रम :

घाटे अळीच्या अंडी, अळी, कोष, आणि पतंग या चार अवस्था असतात. त्यातील अळी अवस्था खूप नुकसानकारक असते. मादी पतंग साधारणपणे २५०- ५०० गोलाकार आकाराचे हिरवट पिवळसर अंडी पानावर, कळीवर व फुलावर एक एक घालते. ५ ते ६ दिवसांत त्यातून अळी बाहेर पडते.

अळीचा रंग हिरवट असून, हा रंग पिकानुसार बदलतो. १४-२० दिवसांत अळीची वाढ पूर्ण झाल्यानंतर ती पिकाच्या जवळ जमिनीत कोषावस्थेत जाते. तिचा कोष अवस्थेचा काळ हा एक आठवडा ते एक महिन्यापर्यंत असू शकतो. अशा प्रकारे एका वर्षात घाटे अळीच्या ७ ते ८ पिढ्या पूर्ण होतात.

नुकसानीचा प्रकार :

हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव नोव्हेंबर ते मार्च महिन्यापर्यंत दिसून येतो. हवेतील आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा जास्त, कमी सूर्यप्रकाश या बाबी किडींच्या प्रादुर्भावास पोषक ठरतात. लहान अळी पानावरील हरितद्रव्य खाते, त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसतात.

मोठी अळी कळी, फुले आणि घाटे खाते. एक अळी साधारणपणे ३० ते ४० घाटे खात असल्यामुळे मोठे (३५ ते ४० टक्के) नुकसान होते. अर्धे शरीर घाट्यामध्ये तर अर्धे शरीर बाहेर अशा अळ्या पिकात दिसून येतात.

एकात्मिक कीड व्यवस्थापन

पेरणीच्या वेळी मका किंवा ज्वारीचे बियाणे मिसळून टाकल्यास ते वाढल्यानंतर पक्षिथांबे म्हणून उपयोगी ठरतात. हे काम केलेले नसल्यास लाकूड किंवा बांबूपासून ॲंटेनाप्रमाणे पक्षिथांबे बनवून एकरी २० ते २५ या प्रमाणात लावावेत.

पीक ३० ते ४५ दिवसांचे असताना आंतरमशागत व कोळपणी करून घ्यावी.

आंतरमशागत करून उदा. कोळशी, रानभेंडी, पेटारी ही तणे वेळोवेळी काढून टाकावी.

शेतामध्ये पक्षिथांबे लावावेत.

घाटे अळीच्या नियंत्रणासाठी एकरी ५ ते ६ कामगंध सापळे लावावेत.

मुख्य पिकाभोवती सापळा म्हणून झेंडूची एक ओळ लावल्यास त्याकडे किडी आकर्षित होतात.

मोठ्या अळ्या शेतात दिसत असतील, तर वेचून नष्ट कराव्यात.

पीक कळी अवस्थेत असताना, ॲझाडिरॅक्टीन (३०० पी.पी.एम.) २ ते ३ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही. (५०० एल.ई.) विषाणूजन्य कीटकनाशकाची १ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे वापरावे.

किडीनी आर्थिक नुकसानीची पातळी (१ ते २ अळ्या प्रति एका मीटर ओळीत किंवा ८ ते १० पतंग प्रति एक कामगंध सापळा) ओलांडल्यानंतर खालीलपैकी कोणत्याही एका रासायनिक कीटकनाशकाची फवारणी प्रति लिटर पाण्यात मिसळून नॅपसॅक पंपाने करावी.

इमामेक्टीन बेन्झोएट (०.५ टक्का एस.जी.) ०.४४ ग्रॅम किंवा

क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्का एस.सी.) ०.३ मिलि किंवा

इन्डोक्साकार्ब (१५.८० ई.सी.) ०.६६६ मिलि किंवा

क्विनॉलफॉस (२५ ई.सी.) २ मिलि किंवा

लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (०५% ई.सी.) ०.८ मिलि

(सर्व कीटकनाशकांना लेबल क्लेम आहेत.)

आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.

कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत. फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे. खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे. बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे.

लेबल क्लेम वाचावेत. पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत. रसायनांचा गट तपासावा. पीएचआय, एमआरएल तपासावेत. पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.

अमोल ढोरमारे, ९६०४८३३७१५

(सहायक प्राध्यापक कृषी कीटकशास्त्र विभाग सौ. के.एस.के (काकू) कृषी महाविद्यालय, बीड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT