Crop Fertilizer Management Agrowon
ॲग्रो विशेष

Integrated Crop Management : कीड, रोग नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन गरजेचे

Pest Control Management : रासायनिक कीटकनाशकांच्या अशास्त्रीय अतिवापरामुळे मानवी आरोग्य व शेतीच्या जैवविविधतेवर मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Team Agrowon

Nashik News : रासायनिक कीटकनाशकांच्या अशास्त्रीय अतिवापरामुळे मानवी आरोग्य व शेतीच्या जैवविविधतेवर मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्याचबरोबर उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे.

यातून शेतकऱ्यांना बाहेर पडायचे असेल तर कीड व रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अंगीकारणे अत्यंत गरजेचे आहे, असा सल्ला केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राचे उपसंचालक डॉ. अतुल ठाकरे यांनी केले.

चितेगाव (ता. निफाड) येथे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र नाशिकच्या वतीने खरीप हंगाम २०२४-२५ साठी दोनदिवसीय एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी उपस्थित तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

चितेगावचे सरपंच सुभाष गाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला सहायक वनस्पती संरक्षण अधिकारी ऋषिकेश मानकर, अमित जाधव, विशाल काशीद, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी डॉ. सुरेश गायकवाड, कृषी सहायक अर्चना सातपुते, कृषिमित्र मयूर शेलार तसेच राहुल दळवी, सुभाष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. ठाकरे यांनी मका व भाजीपाला पिकावरील किडी व त्यावरील एकात्मिक व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. मशागतीय, यांत्रिक, जैविक व रासायनिक या सर्व पद्धतींचा एकत्रित वापर केल्यास कीड व रोगांचे प्रभावी नियंत्रण तर होतेच त्याच बरोबर फक्त रासायनिक कीटकनाशकांवर असणारे अवलंबित्व कमी होऊन उत्पादन खर्चामध्येही बचत होते.

डॉ. गायकवाड यांनी पिकांवरील कीटकनाशकांच्या अंश व त्याचे प्रयोगशाळेतील महत्त्व, ऋषिकेश मानकर यांनी कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबद्दल माहिती दिली. विशाल काशीद यांनी विविध प्रकारच्या कीटक सापळ्यांची माहिती दिली.

या वेळी विविध प्रकारचे सापळे, जैविक कीटकनाशके व फवारणी करताना वापरावयाच्या सुरक्षासाधनांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते यासही शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राचे अधिकारी यांनी प्रक्षेत्र भेटीदरम्यान शेतकऱ्यांना कीड व रोगांचे निरीक्षण करून करावयाच्या उपाय योजनांची माहिती करून दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमास चितेगाव शिवारातील शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT