PM Kisan  agrowon
ॲग्रो विशेष

८० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना धक्का! PM Kisan Scheme चे हप्ते करावे लागणार परत

PM-Kisan Samman Nidhi : पीएम किसान योजनेचे लाभार्थी आयकर भरण्यास किंवा इतर कारणांमुळे अपात्र आढळले आहेत, त्यांना आतापर्यंत मिळालेला किसान सन्मान निधी सरकारला परत करावी लागेल.

Swapnil Shinde

PM-Kisan Samman Nidhi : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत हप्ते मिळालेल्या बिहारमधील ८० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. इनकम टॅक्स आणि अन्य कारणांमुळे अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत मिळालेला निधी सरकारला परत करावा लागणार आहे.

बिहार राज्य सरकारचे कृषी संचालक (कृषी) आलोक रंजन घोष यांनी माहिती दिली की, केंद्र सरकारने बिहारमधील एकूण ८१ हजार ५९५ पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी अपात्र ठरवले आहे. त्या अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे काढण्याची प्रक्रिया जलद करण्यास सांगितले आहे. राज्यातील ८१ हजार ५९५ शेतकऱ्यांकडून सुमारे ८१.५९ कोटी रुपये परत घ्यायचे आहेत.

आलोक रंजन घोष पुढे म्हणाले, “राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत, बँकांच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना अपात्र शेतकऱ्यांकडून रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यास सांगण्यात आले आहे. आवश्यक असल्यास, अपात्र शेतकर्‍यांना नवीन स्मरणपत्रे पाठविण्याचा सल्ला देखील बँकांना देण्यात आला आहे. याशिवाय अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यातून होणारे व्यवहारही बँकांना थांबवण्यास सांगण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Subsidy for Equipment: पन्नास टक्के अनुदानावर पंप, रोटाव्हेटर, कडबाकुट्टी

Solapur Water Shortage: सोलापुरात टंचाई निवारणासाठी ९.६७ कोटींचा कृती आराखडा

Drought Compensation: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या : राष्ट्रवादी

Rabi Sorghum Seeds: रब्बी ज्वारीचे बियाणे १०० टक्के अनुदानावर

Fisheries Business: मत्स्य व्यवसाय विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना

SCROLL FOR NEXT