Namo Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Namo Shetkari Yojana : ‘नमो महासन्मान’ योजनेचा हप्ता दसऱ्यापूर्वी

Agriculture Scheme : अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीचा विकास करण्यासाठी आर्थिक साह्य करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे.

Team Agrowon

Yavatmal News : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या (पीएम किसान) धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेत जिल्ह्यातील जवळपास साडेतीन लाख शेतकरी पात्र ठरणार आहेत. या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळणार असून, पहिला हप्ता दसऱ्यापूर्वी जमा होण्याची शक्यता आहे.

अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीचा विकास करण्यासाठी आर्थिक साह्य करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे. याच धर्तीवर आता राज्य शासनानेही महासन्मान योजनेची घोषणा केली होती. पीएम किसान योजनेत जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकरी लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या योजनेतील पात्र शेतकरी कुटुंबियांना दोन हजार प्रतिहप्ताप्रमाणे तीन हप्त्यांत सहा हजार प्रतिवर्ष मिळणार आहेत. यानंतर आता राज्य शासनही सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देणार आहे. राज्य शासनाच्या पहिल्या हप्त्याचे वितरण दसऱ्यापूर्वी होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने तयारी सुरू आहे.

जिल्ह्यात तीन लाख शेतकऱ्यांना ही मदत सुरुवातीला मिळाली होती, नंतर केंद्र सरकारने आयकर भरणारे शेतकरी व शेती नावावर असलेले नोकरदार यांना यातून वगळले. त्यामुळे ही संख्या काहीशी कमी झाली. पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या लाभार्थींना आधार, कार्ड बँक खात्याशी लिंक करणे व आधार तसेच बँक खाते यापूर्वीच लिंक असेल तर त्याची ई-केवायसी प्रक्रिया करून घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.

माहिती अद्ययावत करा!
पीएम किसान सन्मान योजनेसाठी सर्व नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे बंधनकारक होते. आता राज्य शासनही रक्कम देणार असल्याने लाभार्थ्यांना योजनेचा लाभ अखंडितपणे मिळविण्यासाठी आपले आधार कार्ड, बँक खाते पुस्तिकेची सुस्पष्ट प्रत व जमिनीच्या कागदपत्रांसह (७/१२ उतारा आदी) तयार ठेवावा लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT