Water Testing  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Test : ‘स्वच्छ सर्वेक्षणा’त जलस्रोतांची तपासणी

Water Resources : जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि पाणी व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३२५ जलस्त्रोतांची तपासणी करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Nashik News : : जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि पाणी व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३२५ जलस्त्रोतांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी १ एप्रिलपासून मोहीम सुरू झाली. ३० एप्रिलपर्यंत ही तपासणी मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे.

या मोहिमेत जलस्रोतांच्या गुणवत्तेनुसार लाल, पिवळे आणि हिरवे कार्ड ग्रामपंचायतींना दिले जाईल. या स्वच्छता सर्वेक्षण अभियानात १० हजार ३२५ स्रोतांचे पाणी नमुने गोळा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आरोग्य विभाग व जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष यांच्या समन्वयाने स्वच्छता सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. पाण्याचे स्रोत व अन्य बाबींसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्वच्छता सर्वेक्षण केले जाते. सर्वेक्षणाद्वारे ग्रामपंचायतींना लाल, हिरवे, पिवळे, चंदेरी कार्ड वितरित केले जाते.

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत कार्यरत द्वितीय वैद्यकीय अधिकारी यांच्यावर या सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. पाणी गुणवत्ता शाखेकडून शुद्ध निर्जंतुक पाणी ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी आणि नंतर स्वच्छता सर्वेक्षण राबविले जाते.

सद्यःस्थितीत जिल्ह्यात नळ पाणीपुरवठा योजनेचे चार हजार ६१३ हातपंप, पाच हजार ७१२ सार्वजनिक विहिरी असे एकूण १० हजार ३२५ जलस्रोत असून, या सर्व स्रोतांची तपासणी याद्वारे होणार आहे. अभियानांतर्गत १०० टक्के काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अभियान यशस्वितेसाठी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे.

अभियानात जलसुरक्षकांनी ग्रामपंचायत परिसरातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्य सहायक यांच्या सहकार्याने गोळा करावयाचे आहेत. गोळा करण्यात आलेल्या पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणांच्या उपविभागीय प्रयोगशाळांतून करण्यात येईल.

 पाण्याच्या गुणवत्तेनुसार प्रमाणपत्र मिळणार

सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचेही सर्वेक्षण अभियानाबरोबरच जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रपत्र अ, ब, क तयार करून आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरविण्यात आले असून, त्याद्वारे स्रोतांचा परिसर, योजनेतील गळती, पाणी शुद्धीकरणाबाबतची प्रत्यक्ष पाहणी करून आलेल्या जोखमीप्रमाणे ग्रामपंचायतीस पाणी गुणवत्तेविषयी जोखीम निश्चित करण्यात येणार आहे. त्या आधारे ग्रामपंचायतीस लाल, पिवळे व हिरवे कार्ड देण्यात येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT