Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पालकमंत्री सावेंकडून पीक नुकसानीची पाहणी

Post Monsoon Crop Damage : जालना जिल्ह्यात २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.

Team Agrowon

Jalna News : जिल्ह्यातील मॉन्सूनोत्तर पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री अतुल सावे गुरुवारी (ता. ३०) सकाळीच थेट बांधावर पोहोचले. बदनापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत त्यांनी नुकसानीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.

जालना जिल्ह्यात २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील १५ गावांतील जिरायती २९३८ हेक्टर, बागायत ६६२३ हेक्टर, तर फळपिकांच्या जवळपास ३४८८ हेक्टरवरील पिकांचे वादळ व काही ठिकाणी तुरळक गारीसह आलेल्या पावसाने मोठे नुकसान केले. कडवंची शिवारातील द्राक्ष पिकांची मोठी हानी झाली. या नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यासह प्रत्यक्ष बांधावर जाऊन केली होती.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे गुरुवारी सकाळीच पालकमंत्री श्री. सावे जिल्ह्यातील नुकसानीच्या पाहणीसाठी बदनापूर तालुक्यात दाखल झाले. बदनापूर तालुक्यातील राजेवाडी शिवारातील शेतकरी विराज गुसिंगे यांच्या मोसंबी बागेच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सोबतच शेलगाव शिवारातील हरिभाऊ अंभोरे यांच्या डाळिंब बागेत झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला.

पालकमंत्र्यांनी या संदर्भात लवकरच बैठक लावून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यासाठी पावले उचलले जातील, असे आश्‍वासन दिल्याची माहिती ही शेतकऱ्यांनी दिली. या वेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, यांच्यासह राजेवाडीचे सरपंच प्रतापसिंग गुसिंगे, माजी सरपंच संजय गुसिंगे शेलगावचे सरपंच परमेश्‍वर अंभोरे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची या वेळी उपस्थिती होती.

नियोजित दौऱ्यानुसार पालकमंत्री बदनापूर तालुक्यातील पीक नुकसानीची पाहणी केल्यानंतर भोकरदन तालुक्यातील पीकपाहणी करणार होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पीक नुकसानीच्या आढावा बैठकीलाही पालकमंत्री उपस्थित राहणार होते.

दोन वर्षांपासूनच्या विम्याच्या पावत्या पडून आहेत. त्याची नुकसान भरपाई अजून मिळाली नाही. मोसंबीच्या आत्ताच्या बहाराचाही विमा उतरविला आहे. नुकसान भरून निघणार नाही. परंतु हेक्टरी किमान एक ते दीड लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, असे अपेक्षा पालकमंत्र्यांकडे व्यक्त केली.
- विराज गुसिंगे, मोसंबी उत्पादक, राजेवाडी
मोसंबी सोबतच डाळिंब बागेचे मोठे नुकसान झाले. दोन्ही पिकांचा बहर वाया गेला. सरकारनं शक्य तितकी जास्त नुकसान भरपाई द्यावी. शिवाय विमा उतरवलाय त्यातूनही भरपाई मिळावी.
- हरिभाऊ अंभोरे, शेलगाव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT