Crop Damage Flood Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीक नुकसानाची माहिती ७२ तासांत विमा कंपनीस कळवा

Crop Damage : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीने नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने यांनी केले आहे.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यात २८ ऑगस्ट २ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून, अजून पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पावसामुळे विमा संरक्षित क्षेत्र जलमय होऊन पिकांचे नुकसान झालेले असल्यास विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची पूर्वसूचना संबंधित विमा कंपनीस ७२ तासांमध्ये कळवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२४ या हंगामाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी खरीप २०२४ मध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पीक विमा योजनेतर्गत खरीप २०२४ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो. विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती, पूर्वसूचना कंपनीस देणे गरजेचे आहे.

नुकसानीबाबतच सूचना पीक विमा कंपनीकडे नोंद करण्यासाठी पीक विमा ॲप अथवा कृषी रक्षक पोर्टल टोल फ्री क्रमांक १४४७ या क्रमांकाचा वापर करावा. तसेच या क्रमांकाबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास सदर आपत्तीची माहिती विमा कंपनीचे तालुका स्तरावरील प्रतिनिधी, बँक कृषी व महसुल विभाग यांना द्यावी असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT