Crop Management  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Management : पीक नियोजन, व्यवस्थापनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी

Dr. Indra Mani : मॉन्सूनोत्तर पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही संधी असतात. त्यादृष्टीने शेतकऱ्यांना उपाययोजना सुचविणे आवश्यक आहे.

माणिक रासवे

Parbhani News : मॉन्सूनोत्तर पावसामुळे उद्‍भवलेल्या परिस्थितीत निर्माण होणारी संभाव्य आव्हाने व संधी तसेच या परिस्थितीत करावयाचे पीक नियोजन व पीक व्यवस्थापन याबाबतचा वैज्ञानिक सल्ला व माहिती सोप्या भाषेत व सुटसुटीत स्वरूपात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. कृषी विभाग व कृषी शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन हे काम केल्यास अधिक परिणामकारक होईल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी (ता. १) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये विस्तार शिक्षण संचालनालयातर्फे आयोजित कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ. इंद्र मणी होते. शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. इंद्र मणी म्हणाले, की मॉन्सूनोत्तर पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही संधी असतात. त्यादृष्टीने शेतकऱ्यांना उपाययोजना सुचविणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी कृषिशास्त्रज्ञांना तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहावे लागेल.

तालुक्यांनी पीक नुकसानीच्या छायाचित्रासह माहिती पाठवावी. ती शासनास सादर करण्यात येईल. या वेळी मराठवाड्यामध्ये सोमवार (ता. २७) पासून झालेल्या मॉन्सूनोत्तर पाऊस, वादळी वारे, गारपिटीमुळे तूर, ज्वारी पिके आडवी झाली. तुरीत फुलगळ झाली. बोंडातून फुटलेला कापूस गळून पडला. भिजल्यामुळे प्रत खालावली. केळीचे पाने चिरली, खोडाचे नुकसान झाले.

शेती पिके तसेच फळपिकांमध्ये पाणी साचून राहिल्याने नुकसान झाल्याची माहिती प्रातिनिधिक स्वरूपात तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सादर केली. त्यानंतर कृषिशास्त्रज्ञांनी या परिस्थितीत करावायच्या उपाययोजना व पीक नियोजन, पीक, कीड, रोग व्यवस्थापन सल्ला याबाबत माहिती दिली. कृषी हवामानशास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे म्हणाले, की मॉन्सूनोत्तर पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले.

रब्बी हंगामाची खात्रीही झाली. खरीप व रब्बी असे दोन्ही हंगामांतील पेरणीस उशीर अशी परिस्थिती यंदा उद्‍भवली आहे. विस्तार कृषिविद्यावेत्ता डॉ. व्ही. पी. सूर्यवंशी म्हणाले, की थंडीचा कालावधीत कमी असल्यामुळे गहू पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळणार नाही. तुरीवरील फुलगळ, हरभरा पिकांतील मर रोग, लोळलेली ज्वारी उभी राहावी यासाठी उपायोजना कराव्यात.

डॉ. संजय पाटील म्हणाले, की अवकाळी पावसामुळे मोसंबी फळबागांचा ताण तुटला. अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. आगामी सहा महिन्यांच्या कालावधीत फळबागा जगविण्यावर भर द्यावा लागेल. कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर म्हणाले, की ज्वारीवरील खोड कीड, तुरीवर शेंगा खाणारी अळी, हरभऱ्यावर घाटे अळी, कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

या किडींच्या व्यवस्थापनासाठी कामगंध सापळे लावावेत बीजप्रक्रिया करून ज्वारीची पेरणी करावी लागेल. या कार्यशाळेस मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील तालुका कृषी अधिकारी, संशोधन केंद्र, विस्तार शिक्षण केंद्रातील कृषी शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्रातील विशेषज्ञ, शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जूनच्या आधीच होईल, कृषिमंत्री भरणेंची महत्त्वाची माहिती

Medical Assistance Fund: वैद्यकीय साह्यता निधीतून २० कोटींची मदत

Fertilizer Demand: खरिपासाठी १.७४ लाख टन खतांची गरज

Tiger Attack: पशुधन विकास अधिकाऱ्यांसह चौघांवर वाघाचा हल्ला

Jairam Ramesh: अमेरिका-इराण चर्चेत पाकिस्तान बनला शांतिदूत?; मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाला धक्का, काँग्रेसची जोरदार टीका

SCROLL FOR NEXT