Water Stock Agrowon
ॲग्रो विशेष

Dam Water Stock : पुणे जिल्ह्यातील २६ धरणांत साडेसहा टीएमसी पाण्याची आवक

Water Stock Update : सध्या जिल्ह्यातील २६ धरणांत नव्याने ६.६९ टीएमसी पाण्याचा येवा आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा १५.०७ टीएमसी म्हणजेच ७ टक्के पाणीसाठा झाला आहे.

Team Agrowon

Pune News : मॉन्सून दाखल झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. सात जूनपासून पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे धरणांत नव्याने पाण्याची आवक सुरू झाली आहे. सध्या जिल्ह्यातील २६ धरणांत नव्याने ६.६९ टीएमसी पाण्याचा येवा आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा १५.०७ टीएमसी म्हणजेच ७ टक्के पाणीसाठा झाला आहे.

सध्या जिल्ह्यातील २६ धरणांतील पाण्याची उपयुक्त क्षमता १९८.३४ टीएमसी एवढी आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्यानंतर वेगाने पाणीसाठा कमी झाला होता. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यातील धरणांत नव्याने १.१४ टीएमसी एवढ्या पाण्याची नव्याने आवक झाली आहे. एक ते १२ जून या कालावधीत मुठा खोऱ्यातील टेमघर धरण क्षेत्रात ९४ मिलिमीटर पाऊस पडला. तर, वरसगाव ६७, पानशेत ६३, खडकवासला ९३ मिलिमीटर पाऊस पडला.

कुकडी खोऱ्यातील घोड धरणक्षेत्रात सर्वाधिक १५० मिलिमीटर, येडगाव ५०, पिंपळगाव जोगे २४, माणिकडोह ५२, वडज २२, डिंभे ४३, चिल्हेवाडी २१, पाऊस पडला. तर भीमा खोऱ्यातील उजनी धरणक्षेत्रात १४१, विसापूर ९० मिलिमीटर, नीरा खोऱ्यातील भाटघर धरणक्षेत्रात १३१ मिलिमीटर, वीर ९८, गुंजवणी ६१, नीरा देवघर ७२, नाझरे १३२, वडिवळे १६, आंध्रा २६, भामा आसखेड २६, चासकमान १०४, कळमोडी ५२, कासारसाई ५६, पवना ७८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

बुधवारी (ता.१२) सकाळी आठ वाजेपर्यंत धरणांत आलेला पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

पानशेत ०.०१, खडकवासला १.१०, पवना ०.०७, चासकमान ०.०१, आंध्रा ०.०९, गुंजवणी ०.०२, भाटघर ०.०९, नीरा देवघर ०.०२,वीर ०.९५, पिंपळगाव जोगे ०.८७, माणिकडोह ०.०५, येडगाव १.०६, विसापूर ०.०२, उजनी ३.१९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jayakwadi Dam Water Release: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा, जायकवाडीतून ५ नोव्हेंबरपासून रब्बीतील पहिले आवर्तन

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरमध्ये ४३ हजार शेतकऱ्यांची कोंडी! कर्जमुक्तीची प्रतीक्षा कधी संपणार?

Farmer Loan Waiver : कर्जमाफीचा लाभ आत्तापर्यंत किती पात्र शेतकऱ्यांना मिळाला?

Strawberry Center Ware : थेट शेतातून ग्राहकांच्या हाती! वारे येथे स्वतंत्र स्ट्रॉबेरी केंद्राचे उद्घाटन, पर्यटकांची गर्दी

Farmer Issue: आधार प्रमाणीकरणानंतरही कर्जमुक्ती नाही

SCROLL FOR NEXT