Soybean Disease  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Yellow Mosaic : घनसावंगी भागात सोयाबीनवर ‘येलो मोझॅक’चा प्रादुर्भाव

Soybean Disease : सोयाबीन पिकांवर ‘यलो मोझॅक’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. काही भागातील सोयाबीन वाळू लागली आहे.

Team Agrowon

Jalana News : सोयाबीन पिकांवर ‘यलो मोझॅक’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. काही भागातील सोयाबीन वाळू लागली आहे. आधी पावसाअभावी पिकांच्या उत्पादनात होणारी घट त्यातच या रोगांच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन उत्पादक दुहेरी संकटात सापडले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन व कापूस दर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहेत. त्यामुळे या दोन्ही पिकांच्या क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र सोयाबीनवर यंदा ‘यलो मोझॅक’ने हल्ला केला आहे, त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्‍यता आहे.

घनसावंगी तालुक्‍यात शेतकऱ्यांनी कापसांबरोबर सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. पेरणीदरम्यान अल्प पाऊस पडल्याने पीक काही प्रमाणात तग धरून होते. त्यानंतर पाऊस झाल्याने या पिकांना नवजीवन प्राप्त झाले. मात्र मध्यतंरी एक ते दीड महिना पाऊस पडला नाही. त्यामुळे सोयाबीनचे पीक सुकू लागले होते.

कडक ऊन, ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस अशा वातावरणातील बदलांचा सोयाबीनच्या पिकावर परिणाम झाला. सोयाबीनचे पीक कोमेजण्यासह शेंगा देखील वाळू लागल्या आहेत.

त्यातच यलो मोझॅक रोगापासून पीक वाचविण्यासाठी शेतकरी महागड्या कीटकनाशकांची फवारणी देखील करीत आहे. पावसांच्या उघडिपीमुळे पाण्याची समस्या, वाढते तापमान यांचा फटका पिकाला बसला आहे. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन कमी होण्याची शक्‍यता आहे.

यंदा संपूर्ण पावसाळ्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सोयाबीनसह सर्वच पिकांच्या उत्पादकतेत घट झाली. त्यातच सोयाबीनच्या पिकांवर ‘यलो मोझॅक’चा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट होणार आहे. परिणामी पिकातून उत्पन्न हाती येण्याची शक्‍यता कमीच आहे. प्रशासनाने पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी.
- अशोक गोडसे, शेतकरी, पानेवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Genetic Editing Varieties : आयसीएआरने केले २४ पिकांमध्ये जनुकीय संपादन; भाताच्या दोन सुधारित वाण विकसित, लोकसभेत सरकारने दिली माहिती

Agriculture Budget: शेतीसाठी आर्थिक तरतूद वाढवा, संशोधन पदे तातडीने भरा, संसदीय समितीची सरकारला शिफारस

Local Body Elections: ग्रा.पं.वर प्रशासकाचे सावट!

Citrus Symposium 2025: जैन हिल्स येथे रविवारपासून  लिंबूवर्गीय शेतीविषयी मंथन

Water Scarcity: नांदी गावात हिवाळ्यातच पाणीटंचाई

SCROLL FOR NEXT