Turmeic Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Disease : हळदीवर करपा,कंदमाशीचा प्रादुर्भाव

Turmeric Crop Issue : बदलते हवामान, अतिपाऊस, काही अंशी धुके, पाणी साठून राहणे आदी कारणांमुळे हळद पिकावर करपा रोगाचा २० टक्के, तर कंद माशीचा १५ टक्के प्रादुर्भाव झाला आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : बदलते हवामान, अतिपाऊस, काही अंशी धुके, पाणी साठून राहणे आदी कारणांमुळे हळद पिकावर करपा रोगाचा २० टक्के, तर कंद माशीचा १५ टक्के प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे हळद पिकावर नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढावले असल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या मागचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे दिसत नसल्याचे चित्र आहे.

देशात यंदाच्या हंगामात अंदाजे ३ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. मुळात हळदीचे उत्पादन घेणाऱ्या राज्यात हंगामाच्या प्रारंभी पाणीटंचाई निर्माण झाल्याने लागवडी लांबल्या होत्या. त्यानंतर पाऊस सुरू झाला. त्यामुळे हळद पिकास पाऊस उपयुक्त ठरला. गेल्या महिन्यात हळदीवर कंदकुज होण्याची लक्षणे दिसू लागली होती. शेतकऱ्यांनी प्रादुर्भाव कमी करण्याचे प्रयत्नही केले. परंतु सतत पाऊस असल्याने पुन्हा रोगाचा प्रादुर्भाव वाढला.

सध्या हळद शाखा वाढीच्या काळात पीक असून कंदही वाढीच्या अवस्थेत आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत सलग पाऊस पडला. शेतात पाणी साचले. पाणी निचरा झाला नाही. परिणामी, याचा फटका हळदीवर झाला. सध्या पाऊस आणि धुके यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. करपा रोगामुळे पानांची संख्या कमी होते.

यामुळे अन्नद्रव्ये तयार होण्यास अडचणी झाल्याने पिकाला पुरेशे अन्नद्रव्ये मिळत नाहीत. परिणामी हळदीचा कंदाची वाढ अपेक्षित होत नाही. त्यातच कंदमाशीचा प्रादुर्भाव होण्यासही सुरुवात झाली असल्याचे चित्र आहे. देशातील हळदीवर २० टक्के करपा, तर १५ टक्के कंद माशीचा प्रादुर्भाव झाला आहे. या दोन्ही रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होण्याचा प्राथमिक अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत.

उत्पादन घटण्याचा अंदाज : डॉ. मनोज माळी

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांत अतिपाऊस झाला. यामुळे शेतातील पाण्याचे माती वाहून गेली आहे. परिणामी, हळद पिकाची अपेक्षित वाढ झाली नाही. यामुळे दोन्ही राज्यांतील हळद पीक धोक्यात आले आहे, असे हळद संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. मनोज माळी यांनी सांगितले. त्यामुळे या दोन्ही राज्यांतील हळदीचे उत्पादन घटेल, असाही अंदाज व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT