Dry Fruits Import Agrowon
ॲग्रो विशेष

Dry Fruits Import : भारत-पाक तणावाचा सुका मेवा आयातीला फटका?

Dry Fruits Import : अफगाणिस्तान भारताचा प्रमुख सुका मेवा पुरवठादार देश आहे. अफगाणिस्तानमधून सुमारे २० हजार टन निर्यात भारतात केली जाते. परंतु भारताने सीमारेषा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Dhananjay Sanap

Dry fruit prices : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारताने पाकिस्तानच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम अफगानिस्तानमधून होणाऱ्या सुका मेव्याच्या पुरवठ्यावर होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात देशातील बाजारात सुका मेव्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत.  

अफगाणिस्तान भारताचा प्रमुख सुका मेवा पुरवठादार देश आहे. अफगाणिस्तानमधून सुमारे २० हजार टन निर्यात भारतात केली जाते. परंतु भारताने सीमारेषा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमधून आयात केल्या जाणाऱ्या सुके जर्दाळू, बदाम, काळे आणि हिरवे मनुके, पिस्ते, अक्रोडवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

सध्या अमेरिकेहून आयात होणारी काही उत्पादन दुबईमार्गेच भारतात आणली जातात. त्यात आता भारत-पाकिस्तान संबंध बिघडले आहेत. त्यामुळे आता भारताला अफगाणिस्तानमधील आयात दुबईमार्गे करावी लागण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. त्यातून वाहतूक खर्चात वाढ होऊ शकते. परिणामी देशांतर्गत बाजारातील सुका मेव्याच्या दरात वाढू होऊ शकतात, असं आयातदार सांगतात. 

आता काबूलहून काही विमानांनी भारताला होणारा पुरवठा खोळंबला आहे. त्यामुळे अंजीर आणि मणुक्यासारख्या औषधी मूल्य असलेल्या मालाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यापारी व्यक्त करत आहेत. तर अटारी सीमा बंद झाल्यामुळे अफगानिस्तानमधून येणाऱ्या मालाच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे. सध्याही अंदाजे ३० ट्रक सीमेच्या पलीकडे परवानगीविना अडकून पडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.  

देशात लग्नसराईचा काळ आहे. त्यामुळे सुका मेव्याला मागणी मोठी असते. त्यासाठी देशातील साठा पुरेसा आहे. परंतु आगामी सणासुदीच्या काळात मागणी वाढण्याची शक्यता आहे. जुलै ते ऑगस्ट दरम्यान नवीन माल बाजारात येईपर्यंत मागणी अधिक वाढलेली असेल, असं मत जाणकार व्यक्त करत आहेत. 

सुका मेव्याच्या आयात दरात आधीच १० ते १५ टक्के वाढ झालेली आहे. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता, अफगाणमधील सुका मेवा आयातीसाठी इराणमधील चाबहार बंदर हा पर्याय असू शकतो, असं काही जाणकार सांगतात. परंतु या बंदर मार्गाने होणारी वाहतूक एक महिना उशिराने होते. तसेच मालाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. रस्ते मार्गाने मात्र ३ ते ४ दिवसात वाहतूक केली जाते. परंतु आता या बंदर मार्गाने वाहतूक केली तर वाहतूक खर्चात वाढ होणार आहे. 

आयातीचे दर (प्रति किलो)

मामरा बदाम- २ हजार ते २ हजार ५०० रुपये 

पिशोरी पिस्ता ३ हजार ते ३ हजार ५०० रुपये

सुके अंजीर-  ६०० ते १४०० रुपये 

काळे मनुके-  २०० ते ३५० रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Industry: बांबू उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून उपाययोजना; विधानसभेत वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन

Agrowon Podcast: डाळिंबाचा भाव तेजीत; सोयाबीनमध्ये काहीशी वाढ, कापूस दर स्थिर टोमॅटो भावात चढ उतार तर ज्वारीला उठाव तर

Rajya Sabha Elections 2026: राज्यसभेसाठी भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवलेंना उमेदवारी, यादीत दोन नवे चेहरे

ISRO Wari: ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ‘इस्रो वारी’!

Ai in Dairy Farming: कृत्रिम बुद्धिमत्तेतून दुग्ध व्यवसायात परिवर्तन

SCROLL FOR NEXT