Sugarcane FRP
Sugarcane FRP Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : फेब्रुवारी, मार्चमध्ये येणाऱ्या उसासासाठी वाढीव अनुदान

Team Agrowon

Solapur Sugarcane News : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर एक पिंपळनेर व युनिट नंबर दोन करकंब येथे यंदाच्या हंगामात १६ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत गाळपास येणाऱ्या उसासाठी प्रतिटन ७५ रुपये व एक मार्च ते हंगाम अखेरपर्यंत गाळपास येणाऱ्या उसासाठी प्रतिटन १५० रुपये प्रमाणे एफआरपी (FRP) पेक्षा वाढीव अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे (MLA Babanrao Shinde) यांनी दिली.

आमदार शिंदे म्हणाले, की विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे (Vitthalrao Shinde Cooperative Sugar Factory) युनिट नंबर एक पिंपळनेर येथे आजअखेर १४ लाख २१ हजार २३४ टन व युनिट नंबर दोन करकंब येथे आजअखेर चार लाख ३४ हजार ७८७ टन उसाचे गाळप झालेले आहे.

दोन्ही युनिटचे मिळून सध्या १८ लाख ५६ हजार २१ टन उसाचे गाळप झालेले आहे. या गळीत हंगामामध्ये ऊस पुरवठादार सभासद व ऊस पुरवठादार यांच्या उसाचे नुकसान होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला आहे.

या हंगामासाठी ऊसतोडणी वाहतूक खर्च वजा जाता अंदाजे एफआरपी प्रतिटन २६२० रुपये येत असून, वाढीव अनुदानामुळे फेब्रुवारीतील उसाला एफआरपीपेक्षा प्रतिटन २६९५ रुपये व एक मार्च ते हंगाम अखेरपर्यंत गाळपास येणाऱ्या उसासाठी प्रतिटन २७७० रुपये ऊसदर मिळणार आहे.

कारखान्याने ३१ जानेवारी अखेर प्रतिटन २३५० रुपये प्रमाणे पहिला ॲडव्हान्स ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना अदा केलेला आहे, अशी माहितीही आमदार शिंदे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT