Onion Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Onion Market : काद्यांची आवक वाढली दरावर किंचीत परिणाम, कोल्हापूर बाजारपेठेत अशी आहे स्थिती

Kolhapur Market Yard : किरकोळ बाजारपेठेत अद्याप कांद्याचे भाव ३० ते ५० रुपये एक किलो भावाने मिळत आहेत. नव्या कांद्याची आवक ऑक्टोबरनंतर होणार आहे.

sandeep Shirguppe

Shahu Market Yard Kolhapur : सध्या कांदा बाजारात मोठी चढ उतार पहायला मिळत आहे. अशातच कोल्हापूर शाहू मार्केट यार्डातील कांदा, बटाटा बाजारपेठेत कांद्याच्या आवकेत दुपटीने वाढ झाली आहे, परिणामी भाव कमी झाला असून सरासरी ३५० रुपये दहा किलो असे भाव आहेत. असे असले तरी किरकोळ बाजारपेठेत अद्याप कांद्याचे भाव ३० ते ५० रुपये एक किलो भावाने मिळत आहेत. नव्या कांद्याची आवक ऑक्टोबरनंतर होणार आहे. त्यामुळे सध्या घाऊक कांद्याला उठाव चांगला मिळत असल्याचे चित्र आहे. सणासुदीत कांद्याची आवक वाढणार आहे.

शाहू मार्केट यार्डातील कांदा बटाटा बाजारपेठेत रोज १५ ते २० गाड्या कांद्यांची आवक होत होती. गेल्या आठवड्यापासून कांद्याची आवक दुप्पट झाली, म्हणजे रोजच ४० गाड्या कांदा येत आहे. पुणे, मुंबई, सोलापूर, नाशिक बाजारपेठेत कांद्याचे भाव घसरले. तसेच गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे तेथील बाजारपेठेत कांद्याची मागणी कमी झाली. त्यासोबत भावही घसरले.

याच वेळी कोल्हापूर बाजारपेठेत मात्र इतर बाजारपेठांच्या तुलनेत दोन ते पाच रुपये घाऊक भाव जास्त आहेत. त्यामुळे अहमदनगर ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण, सातारा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कांदा कोल्हापूर बाजारपेठेकडे पाठवला आहे. यात आठवड्याभरा पासून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पाऊस आहे. अजून किमान महिनाभर पाऊस होणार आहे.

या काळात कांदा भिजून नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी कांदा कोल्हापूर बाजारपेठेत पाठवत आहेत. त्यामुळे येथील आवक वाढल्याने कांद्याचे भाव कमी झाले आहेत. यातून कांद्याची मागणी वाढली आहे येथील बहुतांशी कांदा कोकण व गोव्याकडे पाठवला जात आहे.

घाऊक भाव असे

  1. प्रथम श्रेणी कांदा ४०० ते ५०० रुपये

  2. व्दितीय श्रेणी कांदा ३०० ते ४०० रुपये

  3. तृतिय श्रेणी कांदा २०० ते ३०० रुपये

  4. चतुर्थ श्रेणी कांदा १०० ते २०० रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT