Organic Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Dr. Murali Ingale : शेतात सेंद्रिय खतांचा वापर वाढवा : डॉ. इंगळे

Use of organic fertilizers in agriculture : ‘‘सेंद्रिय शेती जमिनीची सुपीकता व जमिनीतील सेंद्रिय कर्ब टिकवून ठेवण्यासह त्यामध्ये वाढ होण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे,’’ असे मत आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Akola News : ‘‘सेंद्रिय शेती जमिनीची सुपीकता व जमिनीतील सेंद्रिय कर्ब टिकवून ठेवण्यासह त्यामध्ये वाढ होण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे,’’ असे मत आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे यांनी व्यक्त केले.

शेतीतील रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करून जमिनीचा पोत सुधारावा आणि उत्पादित मालाची प्रत वाढावी, यासाठी सेंद्रिय शेतीच्या विकासावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी तालुका कृषी अधिकारी व आत्मा प्रकल्प संचालक कार्यालयातर्फे परंपरागत कृषी विकास योजनेतून शेतकरी प्रशिक्षण व मार्गदर्शन सभा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील सेंद्रिय विभागात झाली.

‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ. योगेश इंगळे, डॉ. परिक्षीत सिंगरूप, अभिजित वंजारी, गोपाळ बोंडे, अमोल हरणे उपस्थित होते. अभिजित वंजारी यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करताना सेंद्रिय खतांची निर्मिती करण्यासह मुलस्थानी जलसंधारण, पीक नियोजन, आंतरपीक लागवड, सेंद्रिय प्रमाणीकरण मानके, काढणी पश्चात तंत्रज्ञान, साठवणूक, मालाची प्रतवारी, विपणन व्यवस्थापनाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले.

प्रकल्प संचालक डॉ. इंगळे म्हणाले, ‘‘सेंद्रिय खतांचा व सेंद्रिय कीटकनाशकांचा सलग तीन वर्षे वापर आणि सेंद्रिय शेतीच्या रूपांतरणाच्या इतर बाबी अवलंबिल्यास रासायनिक शेतीचे सेंद्रिय शेतीमध्ये रूपांतर होऊन तयार होणारा शेतीमाल हा रसायनमुक्त होऊ शकतो. सेंद्रिय शेतीसाठी सेंद्रिय गट निर्मिती करणे

ग्राहकाला रसायनमुक्त शेतमाल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रिय शेतीला चालना देण्यात येत आहे.’’‘आत्मा’ यंत्रणेचे तालुका तंत्र व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार, सहाय्यक तंत्र व्यवस्थापक सचिन गायगोळ, कृषी सहाय्यक के. एस. उमक यांनी घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT