Cooperative Sugar Mill  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar MSP : साखरेच्या किमान विक्री किमतीत केंद्राकडून वाढ करणे गरजेचे

Cooperative Sugar Factory : साखर कारखान्यांना साखर विक्रीतून मिळणारे उत्पन्न, वाढत्या एफआरपी किमतीची जुळणी करताना कसरत करावी लागत आहे.

Team Agrowon

Sangli News : साखर कारखान्यांना साखर विक्रीतून मिळणारे उत्पन्न, वाढत्या एफआरपी किमतीची जुळणी करताना कसरत करावी लागत आहे. सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने टिकवण्यासाठी केंद्राने तातडीने साखरेची किमान विक्री किमतीत वाढ करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ‘विश्वास’चे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले.

चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२५-२६ साठीचा रोलर पूजनाचा कार्यक्रम नाईक यांच्या व उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला.

अध्यक्ष नाईक म्हणाले, ‘‘केंद्राने उसाचा रास्त आणि किफायतशीर भाव (एफआरपी) प्रतिक्विंटल ३४० रुपयांवरून ३५५ रुपये केला आहे. निर्णयामुळे शेतकऱ्यांना उसाला चांगला दर मिळणार आहे. २०१९ पासून साखरेचा दर प्रतिक्विंटल ३ हजार १०० रुपये आहे.

साखरेची किमान विक्री किंमत, इथेनॉलच्या किमतीत प्रमाणबद्ध वाढ करण्याची गरज आहे. २०२५-२६ च्या हंगामात साडेसात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवून नियोजन केले आहे.’’ कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी स्वागत केले.

मिल प्रमुख अशोक पोवार यांच्या हस्ते विधीवत पूजन झाले. अध्यक्ष नाईक, उपाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते रोलरचे पूजन होऊन तो मिलमध्ये बसविण्यात आला. संचालक विराज नाईक, सुरेश पाटील, विश्वास कदम, शिवाजी पाटील, संदीप तडाखे, संभाजी पाटील, यशवंत दळवी, बिरुदेव आमरे, खातेप्रमुख, सभासद आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Issue: नियतीनेच तोडला थुट्टे कुटुंबाचा ‘भरवसा’

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढला

Kharif Sowing: खरीप पेरण्यांत बारामती उपविभाग अव्वल

Maharashtra Agriculture Minister: कृषिमंत्री कोकाटे खानदेश दौरा अर्धवट सोडून परतले

Agri Officers Support: कृषिमंत्र्यांच्या समर्थनासाठी कृषी अधिकारी सरसावले

SCROLL FOR NEXT