Ginger Cultivation
Ginger Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Ginger Crop : आले पिकात गादी वाफ्याची उंची वाढवा

Team Agrowon

Ginger Satara News : ‘‘आले पिकांची मुख्य अवस्था ही फुटवे निघण्याची आहे. या अवस्थेत प्रकाश संश्‍लेषण क्रिया व्यवस्थित पार पडल्यास कंद पोसण्यास मदत होते. पावसाचे दिवस कमी झाले असून, कमी कालावधीत जास्त पाऊस होत आहे.

यासाठी गादी वाफ्याची उंची नेहमीपेक्षा जास्त करून वाफ्यांना उतार करावा,’’ असे मत बोरगाव कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भूषण यादगीरवार यांनी सांगितले.

वाठार (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथे ‘अॅग्रोवन’ व ‘रिवुलिस इरिगेशन इंडिया प्रा. लि’ तर्फे आले पिकावर ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

‘रिवुलिस’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ नितीन जाधव, ज्येष्ठ नेते संभाजीराव गायकवाड, भिकू गायकवाड, किरण साळुंखे, भरत गायकवाड, कल्याणराव गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, निवृत्ती बनावडे, ‘अॅग्रोवन’चे जिल्हा प्रतिनिधी विकास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. यादगीरवार म्हणाले, ‘‘जुलै महिन्यात जमीन कडक होते. अन्नद्रव्यांचे शोषण होत नसल्याने पिकांची वाढीवर परिणाम होतो. यासाठी योग्य मशागत, जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे व भू-सुधारक वापर, रासायनिक खतांचा योग्य वापर व पाण्याचा निचरा करावा.’’

नितीन जाधव म्हणाले, ‘‘आले पिकास पाणी नियोजन ही अंत्यत महत्त्वाची बाब आहे. प्रत्येक पिकांची पाण्याची गरज लक्षात घेऊन ‘रिवुलिस कंपनी’ ठिबक तयार करत असते. सध्या जगात सर्वाधिक ठिबक संच तयार करणारी ही कंपनी आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Season : खरिपासाठी ‘महाबीज’चे साडेतीन लाख क्विंटल बियाणे

Onion Rate : आळेफाटा बाजारात कांद्याचा दर २१० रुपये प्रतिदहा किलो

Online Satbara : ‘सर्व्हर डाउन’मुळे सातबारा उताऱ्यासाठी शेतकऱ्यांना मनस्ताप

Seed Policy : बियाणे कंपन्यांच्या धोरणामुळे कृषी व्यावसायिक त्रस्त

Leopard Terror : आठ दिवसांत सहा बिबटे जेरबंद

SCROLL FOR NEXT