Well  Agrowon
ॲग्रो विशेष

Well Subsidy : ‘नरेगा’मधून विहिरींच्या अनुदानात वाढ

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मगांराग्रारोहयो) मधून सिंचन विहीर नवीन करण्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात एक लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता योजनेतून विहिरीचे काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच लाख रुपये अनुदान मिळेल. एप्रिलपासून मंजूर विहिरींना हे अनुदान मिळेल.

नोटीस ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सिंचन करता यावे, यासाठी तसेच मजुरांना रोजगार मिळावा म्हणून ‘मगांराग्रारोहयो’तून सिंचन विहिरीचे काम करण्यासाठी अनुदानाचा लाभ दिला जातो. पाच एकर क्षेत्राच्या आतील अल्पभूधारक शेतकरी या योजनेचे लाभार्थी ठरतात. लाभार्थ्यांना तीन वर्षांपूर्वी दोन लाख ९० हजार रुपयांवरून तीन लाख ९० हजार रुपये अनुदान करण्यात आले.

तेव्हापासून आतापर्यंत सुमारे २९ हजार ४९० विहिरींची कामे पूर्ण झाली असून १ लाख ५५ हजार १६४ विहिरींची कामे प्रगतिपथावर आहेत. या योजनेच्या कामावरील मजुरांच्या मजुरीत वाढ करण्यात आली असून आता प्रतिदिन २९७ रुपये मजुरी मिळते. याशिवाय विहीर बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरातही मोठी वाढ झालेली आहे. या दोन्ही बाबी विचारात घेऊन शासनाने विहिरीच्या अनुदानातही चार लाख रुपयांवरून पाच लाख रुपये वाढ केली आहे.

एप्रिल २०२४ पासून मंजूर झालेल्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना वाढीव अनुदानाचा लाभ होईल. शासनाच्या रोजगार हमी विभागाने या संदर्भात आदेश काढला आहे. अलीकडच्या काळातील महागाई तसेच मजुरीची वाट पाहता अनुदानात वाढ केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

जिल्हा परिषद योजनेसाठी अडीच लाखच

‘मगांराग्रारोहयो’चे अनुदान वाढले असले तरी जिल्हा परिषदेच्या योजनेचे अनुदान मात्र खूपच कमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती या अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सिंचन विहिरींचे अनुदान अडीच लाख रुपये कायम आहे. आधीच कमी अनुदानामुळे या योजनेकडे लाभार्थ्यांनी या योजनांकडे पाठ फिरविली असताना ‘मगांराग्रारोहयो’ व जिल्हा परिषदेच्या योजनांच्या अनुदानात दुपटीने तफावत तयार झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Earthquake : नांदेड जिल्ह्यासह हदगाव आणि हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के

Soil Fertility : जमीन सुपीकतेसाठी हिरवळीचे पीक

Dairy Farming : नियोजनबद्ध दुग्ध व्यवसायातून आर्थिक उन्नती

Integrated Farming : प्रतिकूल परिस्थितीत एकात्मिक शेतीचे यशस्वी मॉडेल

Biroba Yatra : यंदा चांगला पाऊस, बळीराजाला सुखाचे दिवस येतील, उलथा-पालथ होऊन भगवा फडकेल, फरांडे बाबांची भाकणूक

SCROLL FOR NEXT