Silk Cocoon Market Agrowon
ॲग्रो विशेष

Silk Cocoon Procurement : राज्यात रेशीम बीजकोष खरेदीच्या दरात वाढ

Sericulture : बंगळूर येथील केंद्रीय रेशीम मंडळाने प्युपेशन टक्‍केवारीनुसार बीजकोष खरेदीचे दर १२५० ते १३०० रुपये प्रति किलो प्रमाणे जाहीर केले आहेत.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : बंगळूर येथील केंद्रीय रेशीम मंडळाने प्युपेशन टक्‍केवारीनुसार बीजकोष खरेदीचे दर १२५० ते १३०० रुपये प्रति किलो प्रमाणे जाहीर केले आहेत. राज्यातील बीजकोष दरापेक्षा हे २५० ते ३०० रुपयांनी अधिक आहेत.

परिणामी, राज्यात बीजकोष उपलब्धतेत अडसर निर्माण झाला होता. त्याची दखल घेत महाराष्ट्रातही बीजकोषाच्या दरात वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी (ता. ७) या संदर्भातील शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि बाजार मागणी पूर्ण करण्यासाठी एकात्मिक शाश्‍वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२०२८ ला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार २० लक्ष अंडीपुंज निर्मितीवरून ३० लक्ष अंडीपुंज निर्मितीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. बीज कोषापासून अंडीपुंज निर्मिती केली जाते.

सध्या राज्यात गडहिंग्लज (कोल्हापूर) येथे एकमेव बीजकोषापासून अंडीपुंज निर्मिती केंद्र आहे. या ठिकाणी स्थानिक तसेच म्हैसूर (कर्नाटक) मधून अंडीपुंज आणून शेतकऱ्यांना पुरवठा करून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले बीज कोष खरेदी करून अंडीपुंज उत्पादन केले जाते.

सध्या राज्यात बीजकोष खरेदीचा दर ९५० ते १००० रुपये प्रति किलो असा आहे. मात्र बंगळूर येथील केंद्रीय रेशीम मंडळाकडून १२५० ते १३०० रुपये प्रति किलो असा दर दिला जातो. त्यामुळे शेतकरी बीजकोषाची विक्री कर्नाटक किंवा अन्य राज्यांमध्ये करतात. त्याची दखल घेत नागपुरातील रेशीम संचलनालयाने दर वाढीचा प्रस्ताव वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे सादर केला होता.

या प्रस्तावाला वस्त्रोद्योग खात्याकडून मान्यता देण्यात आली आहे. परिणामी, प्युपेशन टक्‍केवारीनुसार बीजकोषाला दर दिला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना नव्याने बीजकोष उत्पादन करावयाचे आहे. त्यांना रेशीम संचालनालयाची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.

प्युपेशन टक्‍केवारी--पूर्वीचे दर--सुधारित दर (प्रतिकिलो, रुपयांत)

८०--९५०--१२५०

८१--९५३--१२५३

८२--९५६--१२५६

८३--९५९--१२५९

८४--९६२--१२६२

८५--९६५--१२६५

८६--९६८--१२६८

८७--९७१--१२७१

८८--९७४--१२७४

८९--९७७--१२७७

९०--९८०--१२८०

९१--९८३--१२८३

९२--९८६--१२८६

९३--९८९--१२८९

९४--९९२--१२९२

९५--९९५--१२९५

९६ पेक्षा अधिक -- १०००--१३००

बीजकोषाचे उत्पादन प्रति १०० अंडीपुंजास किमान ५० किलोग्रॅम होणे आवश्‍यक आहे. त्यानुसार एका किलोमध्ये सरासरी ५०० ते ७५० नग असावे, असा देखील निकष निश्‍चित करण्यात आला आहे. एका किलोमध्ये ७५० पेक्षा अधिक कोष असल्यास सदर कोष रिलींग दराने खरेदी करणे बंधनकारक आहे. राज्यात कोल्हापूर, सांगली या भागांत सद्यःस्थितीत ३०० रेशीम बीज कोष उत्पादक शेतकरी आहेत. रेशीम संचालनालयाकडे त्यांची नोंदणी केली आहे.
- महेंद्र ढवळे, उपसंचालक, रेशीम संचालनालय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT