Rabi Jowar Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Jowar : रब्बी ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात वाढ

Jowar Sowing : राज्यात अजूनही रब्बीचे पेरणीक्षेत्र सरासरीच्या आत आहे. मात्र, ज्वारीची पेरणी गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत १ लाख ९८ हजार ७४८ हेक्टरने वाढली आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : राज्यात अजूनही रब्बीचे पेरणीक्षेत्र सरासरीच्या आत आहे. मात्र, ज्वारीची पेरणी गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत १ लाख ९८ हजार ७४८ हेक्टरने वाढली आहे. राज्यात गव्हाचे क्षेत्र ९ लाखांच्या पुढे सरकले असून अजूनही गव्हाची पेरणी सुरू आहे. यंदाही दुष्काळी परिस्थिती पाहता पाण्याची कमतरता असलेल्या भागात हरभरा, ज्वारी पीक घेण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

राज्यात रब्बीचे ५३ लाख ९६ हजार ९६९ लाख सरासरी हेक्टर क्षेत्र आहे. यंदा आतापर्यंत ५३ लाख ४७ हजार ९४० हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या ९९.९ टक्के पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी आतापर्यंत (१६ जानेवारी) रब्बीची सरासरीच्या ५७ लाख ७४ हजार ३०९ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा राज्यातील बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी आहे.

त्यामुळे खरिपात पिकांना फटका बसला होता. रब्बीतही परतीचा पाऊस झाला नसल्याने पेरण्यावर परिणाम झाला. त्यामुळे पेरण्या टप्प्या टप्प्याने पेरल्या. आता बहुतांश पिकांचा पेरणीचा कालावधी संपला आहे. मात्र हरभरा, गव्हाची अजूनही पेरणी झाली आहे. आतापर्यंतच्या पेरणी क्षेत्राची स्थिती पाहता पाण्याची कमतरता असलेल्या भागात हरभरा, ज्वारीचे पीक घेण्याला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.

आतापर्यंतच्या स्थितीनुसार नगर, सोलापूर, सातारा, सांगली, बीड, धाराशिव, हिंगोली जिल्ह्यांत ज्वारीचे पीक घेण्याला प्राधान्य दिल्याचे दिसत असून दहा जिल्ह्यांत सरासरीच्या जवळ पेरणी झाली आहे. तर राज्यात बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, बीड, लातुर, धाराशिव, नांदेड, परभणी, जळगाव, नगर, सातारा, सांगली, धाराशीव जिल्ह्यांत हरभऱ्याचे क्षेत्र अधिक असून १८ जिल्ह्यांत आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पेरणी झाली आहे. राज्यात अजून रब्बीचे पेरणीक्षेत्र सरासरीच्या आत आहे.

रब्बीचे अधिक क्षेत्र असलेले जिल्हे

- ज्वारी ः जळगाव, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातुर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा.

- हरभरा ः नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातुर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

आतापर्यंतचे रब्बीचे पेरणी क्षेत्र

ज्वारी ः १४ लाख ८८ हजार ०५२

हरभरा ः २४ लाख ८१ हजार ३५६

गहु ः ९ लाख ०१ हजार ७०७

मका ः ३ लाख ०३ हजार २६१

कडधान्य ः १ लाख १ हजार ९५४

करडई ः ४१ हजार ३१३

जवस ः ५ हजार ४५९

तीळ ः १ हजार ११२

सूर्यफूल ः १ हजार ९८७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

Daytime Electricity : शेतीला दिवसा वीज द्या, महावितरणला दिले निवेदन

Maharashtra Election Results 2024 : मुख्यमंत्री शिंदे, फडणीस, अजित पवार, मुंडे आघाडीवर, भुजबळ, दिलीप वळीसे-पाटील पिछाडीवर

Assembly Election Result : कोल्हापुरातून मुश्रीफ, महाडिक आघाडीवर तर सांगलीत जयंत पाटील, विश्वजीत कदम, गाडगीळ यांची आघाडी

SCROLL FOR NEXT