Weather Update Agrowon
ॲग्रो विशेष

Weather Update : कमाल, किमान तापमानात वाढ शक्‍य

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांत हवामान अंशतः ढगाळ राहणे शक्‍य आहे.

 डॉ. रामचंद्र साबळे 

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावरील हवेचे दाब उत्तरेस १०१० हेप्टापास्कल, तर उर्वरित महाराष्ट्रावर १००८ हेप्टापास्कल इतके कमी होत आहेत. त्यामुळे कमाल व किमान तापमानात वाढ होईल. थंडीचे (Cold Weather) प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. ही स्थिती उद्या (ता. ६)पर्यंत राहील.

त्यानंतर बुधवार (ता. ८)पासून पुढे महाराष्ट्रावरील हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके होताच. थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपात राहील. संपूर्ण भारतात थंडीची तीव्रता कमी होण्यास सुरुवात होईल. सूर्याचे उत्तरायण सुरू झाले असून, यापुढे दिवसाचा कालावधी वाढत जाईल.

त्यामुळे किमान व कमाल तापमानात (Temperature) वाढ होत जाईल. मात्र वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहण्यामुळे हवामान थंड व कोरडे राहील. तापमानवाढीमुळे हवेतील सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता कमी होईल. हवामान कोरडे राहील.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांत हवामान अंशतः ढगाळ राहणे शक्‍य आहे. वाऱ्याचा ताशी वेग सामान्यच राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहण्यामुळे थंडी जाणवेल.

मात्र धुळे, नंदूरबार, लातूर या जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ही तितकेच राहील.

बंगालचे उपसागराचे २४ ते २५ अंश सेल्सिअस आणि प्रशांत महासागराचे २५ ते २७ अंश सेल्सिअस इतके राहील. त्यामुळे या आठवड्यात मोठे हवामान बदल जाणवणार नाहीत.

कोकण ः

कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील.

हवामान कोरडे राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५२ टक्के तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २८ ते ३८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र ः

कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअसपर्यंत, नंदूरबार जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअसपर्यंत, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, नंदूरबार जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, धुळे जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस आणि जळगाव जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील.

आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २० ते २३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १० ते ११ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किमी राहील. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

मराठवाडा ः

कमाल तापमान उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस, तर परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता २० ते २३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १० ते १३ टक्के इतकी कमी राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १२ किमी, तर उर्वरित जिल्ह्यांत ताशी ६ ते ८ किमी इतका कमी राहील. वाऱ्याची दिशा लातूर जिल्ह्यात आग्नेयेकडून, तर उर्वरित जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ ः

कमाल तापमान बुलडाणा जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस, तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील.

बुलडाणा जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस, तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता २१ ते २३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ९ ते १० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील.

मध्य विदर्भ ः

यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः निरभ्र राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता २२ ते २४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १० ते ११ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

पूर्व विदर्भ ः

कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील.

आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २५ ते २८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७ ते ११ टक्के इतकी कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ७ किमी आणि वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र ः

किमान तापमान नगर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर सांगली जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, पुणे जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान सोलापूर व नगर जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, तर सांगली व पुणे जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस, कोल्हापूर जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील.

कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ३५ ते ४४ टक्के, तर सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत २० ते २८ टक्के राहील.

दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ११ ते २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ११ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

कृषी सल्ला ः

१) सुरू उसाची लागवड १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी.

२) उन्हाळी भुईमूग, तीळ, सूर्यफूल, बाजरी या पिकांची पेरणी बागायत क्षेत्रात करावी.

३) उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करावी.

४) हरभरा पिकामध्ये घाटे अळीच्या नियंत्रणासाठी पक्षिथांबे उभारावेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Donald Trump Tarrif Decision: डोनाल्ड ट्रम्पचा भारताला जोरदार झटका; सर्वाधिक ५० टक्के आयात शुल्क लावणार

PM Kisan: किसान सन्मान नव्हे, अपमान योजना; पंजाबराव पाटील

Crop Insurance: चंद्रपुरात पीकविम्याला कमी प्रतिसाद

River Linking Project: सिंचन प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध

Anjangaon Surji APMC: अंजनगावसूर्जी बाजार समिती सभापती, प्रभारी सचिवावर गुन्हा

SCROLL FOR NEXT